गेल्या आठवड्या पासून मधुरा मुक्त निवांत आयुष्य जगत होती . कोणाचे बंधन नाही ,कसले पाश नाही . तिला हवे तसे आता जगता येणार होते. सकाळी काम वाली बाई यायची घर झाडून पुसून जायची मन स्वयंपाक करणाऱ्या काकू यायच्या त्याच्या कडून च नाष्टा करून घेऊन मधुरा ऑफिस ला जायला तयार व्हायची. काकू डबा करून द्यायच्या,ती ऑफिस ला गेली की त्या ही घरी जायच्या आणि पुन्हा संध्याकाळी यायच्या. मधुरा फक्त काम करायची ती एका मल्टी नॅशनल कंपनीत मोठ्या पदावर जॉब ला होती पैशाची कसलीच कमतरता नवहती.

आज पंधरा दिवस झाले तिचा घटस्फोट होऊन,तिला हवा होता घटस्फोट अबीर कडून. अबीर शी तिचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते अबीर ही सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. विचाराने वागण्याने एकदम आधुनिक म्हणूनच मधुरा च्या नोकरी चे त्याला वावगे न्हवते . दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार करायचा असे ठरले होते . त्यामुळे अबीर कधी ही मधुरा ला त्रास होईल असा वागत नसे . सगळ्या कामा साठी बाई होती घरात मधुरा ला काही ही बघावं लागत न्हवत. आपल्या कामातल्या हुशारी मूळे तिने प्रमोशन ही लवकर मिळवले होते. तिला आपल्या बुद्धीचा गर्व होता.आता लग्नाला चार वर्षे होत आली होती एकदा अबीर म्हणाला,मधु आता आपण वेल सेटल्ड आहोत तेव्हा मुलाचा विचार करूयात. नाही अबीर मला इतक्यात मूल नको आणि हे बघ हे मूल वैगरे जन्माला घालणं म्हणजे नवऱ्याची गुलामी करण्या सारख आहे मी नाही अजून विचार केला याचा. अग मधु गुलामी काय म्हणतेस आपल्या दोघाच मूल असेल ते. नाही अबीर मला या फ़ंदात नाही पडायच ,मुलाला मोठं करा त्याच्या कडे लक्ष द्या,त्याच आजारपण मला नाही जमणार मी एक कॉर्पोरेट वूमन आहे आज पुरुषा सोबत किंबहुना जास्तच काम करते मी आणि पैसा ही मिळवते मला माझं करियर सपॉइल नाही करायचं.

यावर अबीर गप्प बसला मधु ला हे समजत न्हवत की स्त्री पुरुष समानता आहे म्हणून तिने स्वहताला कमी  लेखून घर आणि मूल सांभाळावे असे अबीर चे म्हणणे न्हवतेच पण मधू ने आत्मसन्मान,नारी स्वातंत्र्य,स्वावलंबन याचा चुकीचा अर्थ लावला होता. अबीर तिला म्हणायची मधु तुझ्या हातच काहीतरी बनव ना खायला तर तिला ते गुलामी वाटायच . अबीर कधी आजारी असेल तर तिने सुट्टी घेऊन त्याची काळजी घ्यावी , इतकी माफक अपेक्षा अबीर ची असायची पण मधुला ते कमी पणा चे वाटायचे. आत्मसन्मान आणि अहंकार यामधला फरक ती विसरली होती. भरपूर पगार आणि अधिकार यामुळे तिचा अहंकार वाढतच चालला होता मात्र अबीर शांत पणे सगळं सहन करायचा. त्याला वाटायचे आज ना उद्या मधुरा बदलेल ,तिला माझी घराची किंमत कळेल. बायको ने नवऱ्या साठी काही गोष्टी करणे म्हणजे ते प्रेम असत याची तिला जाणीव होईल. त्याच गप्प राहणं तिला सहन होत न्हवत.मग तिचा राग आणि अहंकार अजून वाढायचा. कधी अबीर प्रेमाने तिला जवळ घ्यायचा तेव्हा तिला वाटायचे मी याची बायको म्हणून हा मला कधी ही जवळ घेणार आणि स्वहताची भूक भागवणार,तेव्हा ती म्हणायची अबीर मी तुझी प्रॉपर्टी नाही की केव्हा ही तू मला युज करावं. अबीर बेडरूम मध्ये ही हा अपमान चुपचाप सहन करायचा प्रेमाला सुद्धा ती गुलामीच समजायची . त्यात भर म्हणजे तिच्या मैत्रिणी तिला जास्त भडकवायच्या म्हणायच्या मधुरा आपण काय पुरुषाची दासी नाही आहोत त्यांच्या सगळ्या इचछा पूर्ण करायला आपल्या ही समान हक्क आहे कायदा आपल्या बाजूने आहे समान अधिकार आहे मग का म्हणून या पुरुषाची मक्तेदारी सहन करायची. आपण स्वतंत्र देशातील स्वतंत्र आर्थिक दृष्टया स्वतंत्र स्त्रिया आहोत,आपली किंमत त्यांना करावीच लागणार. मैत्रिणी चे ऐकून मधुरा अजूनच अग्रेसिव बनायची. ऑफिस पार्टी पीकनिक कुठेही जायला अबीर तिला अडवत नसे कारण तो ही स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता होता त्याला माहित होते आजची स्त्री स्वतंत्र आहे तिलाही मनासारख जगण्याचा अधिकार आहे. एका रविवारी अबीर तिला म्हणाला मधु तुला वाटत नाही का ग की आपण आई व्हावं ,कधीतरी सुट्टी दिवशी स्वहता काहितरी बनवावं. हे स्त्रीचे उपजत गुण आहेत ग ,प्रेमाने काही गोष्टी कराव्यात अस नाही वाटत तुला. तशी मधुरा चिडली म्हणाली अबीर तुला काय म्हणायचे मी तुझ्या मुलाची आई व्हावं

घर संभाळावं, म्हणजे एक अर्थी तुझ्या ताब्यात राहणं,मी बायको तुझी म्हणून तू मला मनात येईल तेव्हा माझा उपभोग घेणार . अग मधु मला असं नाही म्हणायच तू चुकीचा अर्थ घेतेस. अबीर शान्तच बोलला. पण मधुरा ला राग आलेला ती म्हणाली,अबीर हे सगळं करणं मला कदापि जमणार नाही मी मूल जन्माला घालून माझी फिगर खराब नाही करणार ना ही घरची काम करणार तुला खायला बनवून घालणार समजलं कारण मी एक मल्टीनॅशनल कंपनीत काम करते ,शाळेत शिक्षिका नाही मी! आता मात्र अबीर चिडला म्हणाला,मी काय बोलतो समजते का तुला मधुरा अग आई होणं,नवऱ्याला त्याच्या आवडीच खायला बनवून देणं याला गुलामी म्हणत नाही हे तुझ्या अहंकारी बुद्धी ला समजतच नाहिये स्त्री स्वातंत्र्य अधिकार हे मी कधी ही नाकारले नाही पण एकमेकांच्या काही अपेक्षा शरीराच्या काही गरजा असतात ज्या नैसर्गिक असतात हे ही तू विसरून गेलीस तुला तुझ्या कामा पुढे यशा पुढे काही ही दिसत नाही असेच वागायचे होते तर लग्न का केलेस मग ? तशी मधुरा पण चिडली म्हणाली ,वा रे पुरुष आता जागा झाला ना तुज्यातला खरा पुरुष जो बाई ला फक्त वस्तू समजतो कुठे गेला तो अबीर जो समानतेच्या स्त्री अधिकाराच्या गप्पा मारायचा. मधुरा तुला हवा तो जॉब कर घरकामाला बाई ठेव, मी कायम सोबत आहे तुझ्या हे तूच बोलला होतास म्हणून लग्न केले मी समजले. पण मला नाही वाटले त्या वेळी की तू या स्वातंत्रयाचा असा अर्थ लावशील. तुझ्या अहंकार पुढे तुला माझं प्रेम ही दिसेनासे झाले आहे. अबीर म्हणाला. आता मला नाही राहायचे तुझ्या सोबत अबीर ,मी स्वतंत्र आहे मला मुक्त जगायचे आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करण मला जमणार नाही कारण मी सो कॉलड टिपिकल बायको नाही बनणार मला घटस्फोट हवा आहे. आणि त्यांनतर अबीर मधुरा वेगळे झाले मधुरा एकटी रहात होती  आज सुट्टी होती तिने तिच्या मैत्रिणी ना फोन लावला कारण घरी बसून ती बोअर झाली होती. कुठेतरी फिरायला जाऊ असे म्हणत होती पण कोणी यायला तयार न्हवत . कोण नवऱ्या सोबत शॉपिंग ला चालली होती कोण सिनेमा ला चालली होती कोण मुला सोबत पीकनिक ला जाणार होती. मधुरा ला आश्चर्य वाटले की याच का त्या मैत्रीनि तिच्या ज्या तिला सांगायच्या नवऱ्याचं काम नको करू गुलामी नको करू आणि स्वहता काय करत आहेत? मधुरा स्वहता वरच चिडली. हे एकटे पण तिला खायला उठले होते ती सरळ आई कडे आली.आई म्हणाली कशी आहेस मधु ? मी आहे बरी . का काय झाले तुझा मूड ठीक नाही आज. मधु म्हणाली आई अग हे एकटे पण खायला उठते. ऑफिस वरून  घरी गेले की एकटीच जेवायचे सुट्टी दिवशी कोणी मैत्रीनी माझ्या सोबत न येता त्याच्या फॅमिली सोबत एन्जॉय करतात. आणि अलीकडे पाहतेय मी ऑफिस मधले कलीगज माझ्या शी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. बॉस ही घाणेरडया नजरेने बघत असतो सोसायटी मधले लोक बळेच बोलतात,घरी येतात. मधु हे सगळं का होतंय कळतंय का तुला? अग घटस्फोटीत बाई म्हणजे सगळ्या साठी अवेलेबल तीच चारित्र्य चांगले नसेल म्हणून नवरा सोडून गेला असा समज आपला समाज करतो. एकटी बाई मग तिला आपल्या जाळयात ओढायला हे पुरुष तयारच असतात आणि आता तुला अबीर च सुरक्षा कवच सुद्धा नाही मग जो तो हात मारायला बघणारच. म्हणजे काय आई ती बोलली. मधु नवरा सोबत असला ना  तर हे बाहेर चे लोक मान वर करून बघत नाहीत बाई कडे. तिचा नवरा हा तिला ही सुरक्षितता देत असतो तेच जर तो सोबत नसेल तर हे वासनेने वखवखलेले लोक तुझ्या आजूबाजूला भटकणारच. तू अबीर ला नाही ओळखू शकलीस मधु,त्याला तुझा अभिमान वाटत  होता त्याने तुला कधी बांधून नाही ठेवले ना त्याची कामे सांगून तुला अडकवून ठेवले पण तू मात्र स्त्री समानता हक्क या लेबल पायी नाहक त्याला चुकीचा ठरवलेस. अग स्त्रीला आत्मसन्मान हक्क अधिकार सगळ आहे पण त्याला एक मर्यादा पण आहे . आपल्या स्वातंत्रयाचा किती फायदा घ्यायचा याला ही मर्यादा आहे पण याचा अर्थ पुरुषांची गुलामी करणे नाही. तुझ्या बाबांनी मला कधी या घरात कमी दर्जा दिला का,मी आवडीने सगळं घरचे काम करते म्हणून माझी किंमत कमी झाली आहे का ? तूच विचार करून बघा मधू अबीरच्या सहवासात तू अधिक स्वतंत्र आणि मुक्त पणे आयुष्य जगत होतीस. त्याच प्रेम तुला पायातली बेडी वाटत होती . तू भरपूर पैसा कमवशील ,प्रतिष्ठा ही मिळेल तुला पण जर तुझ्या आनंदात कोणी सोबत नसेल ,हसणारा बोलणारा कोणी सोबत नसेल तर त्या पैशाला काय अर्थ उरणार आहे. तुला अबीर सोबत असताना भीती किंवा असुरक्षितता कधी वाटली का,तू त्याच प्रेम ओळखू नाही शकलीस. अजून ही वेळ गेली नाही मधु तू अबीर ची माफी माग,यात कोणताही कमी पना नाही.जीवनाची सार्थकता जोडण्यात आहे तोडण्यात नाही. मधु ला आई चे म्हनने पटले ती म्हणाली आई माझं खरच चुकलं मी अबीर ला ओळखू नाही शकले. स्वातंत्र्य,समानता या नावा खाली मी चुकीची वागत आले. मी कायम माझा अहंकार जपत आले. आई म्हणाली मग अबीर ची माफी माग तो खूप मोठया मनाचा आहे तुला जरूर माफ करेल आणि समजून ही घेईल. हो आई मी आतच जाते अबीर कडे आणि माफी मागतो त्याची. आणि मधुरा तडक अबीर ला भेटायला गेली. ..

         

         स्त्रीवाद म्हणजे केवळ पुरुषांना कमी लेखणं नव्हे. स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत, किंबहुना मी असं म्हणेन, की पुरूषांना स्त्रियांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत यासाठी ही चळवळ आहे. फेमिनिस्ट म्हणजे पुरुषांना विरोध असं अजिबातच नाही. योग्यता, पात्रता पाहून सर्वांना समान संधी मिळायला हवी. हेच खरं 'फेमिनिझम' आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel