आपल्या महाराष्ट्रात पश्चिम भागात जसे कोल्हापूर,बेळगाव सौन्दती तसेच कर्नाटक ,या ठिकाणी आज ही देवदासी म्हणजेच जोगतिण ,ही प्रथा एक प्रकारची अंधश्रद्धा अस्तित्वात आहे. या प्रथे विरुद्ध कायदा संमत झाला असून ही लपून छपून आज ही देवाशी मुलीच लग्न लावणे,तिला जोगवा मागायला दारोदार पाठवणे ,देवदासी म्हणून तिने आयुष्यभर एकटी राहणे,आणि गावातील प्रतिष्ठित लोक आणि मंदिरातील पूजारी यांची शय्यासोबत करणे हेच त्या देवदासी चे जीवन आहे,महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. ही एक काल्पनिक कथा आहे,कोणाच्या ही भावना दुखवण्याचा हेतू अजिबात नाही,काही परंपरा रूढी आहेत

याचेच उदाहरण स्वरूप ही कथा आहे...

सुमी ,शांता आणि रामा अंगणात खेळत होते,दुपारचे  कडक ऊन होतेच पण एका झाडा खाली हे तिघे खेळत होते,तशी ही यांची घर गावा बाहेर होती,देवदासींची वस्ती म्हणूनच ही पाला वरची घर ओळखली जायची, सुमी खेळन्यात मग्न होती,गाव चे पाटील तिथे आले म्हणाले,काय सुमे शाळा सुटली वाटत,,आवाज आला म्हणून सुमी ने पाटला कडे पाहिले म्हणाली होय सुटली,,तसे पाटील म्हणाले हे घे खाऊ आणि मी बाहेर येई पर्यंत इथेच खेळत बस,असे म्हणत त्यांनी सुमिला बिस्कीट चे पाकीट दिले,सुमी ने ते अनिच्छेने घेतले. पाटील घरी यायचे हे तिला अजिबात आवडत नव्हते , तिने बरेचदा रात्री सुद्धा गाढ झोपेत पाटलाना आपल्या घरात पाहिले होते ते सुद्धा  तिच्या आई सोबत एकत्र झोपलेले,पण या गोष्टी चा अर्थ काय हे तिच्या बाल मनाला अजून समजले नव्हते,सुमी नऊ वर्षाची होती. तिची आई वसुधा बाई जोगतीन म्हणजेच देवदासी होती,घरोघरी जाऊन जोगवा मागत फिरायची,मंदिरात काही काम असेल ते करायची,देवाची सेवा करायची हेच देवदासी चे काम असे,आणि या देवदासीच्या शरिराचा उपभोग घ्यायला गावातील पुजारी, पाटील अजून धन्याढ मंडळी होतीच,सुमी ही कोणाची मुलगी हे वसुधा बाईंना पण माहीत नव्हते . पण आपली मुलगी ती पण देवाची सेवा करणार ती वयात आल्यावर तिचे पण देवाशी लग्न होणार हे गृहीत च होते. गावातील एक शिक्षिका मालती बाई यांनी या वस्ती वर येऊन देवदासींना खूप समजावून सांगितले की ही एक अंधश्रद्धा आहे याला बळी पडू नका,पण  त्याचे कोणी ऐकले नाही आणि गावातील बडी मंडळी त्यांना या कारणा वरून त्रास देऊ लागले,शेवटी बाईनी हार मानून निदान वस्ती वरील मुलांना शिकवण्याची परवानगी घेतली जेणे करून देवदासींची मुले काही चांगल्या गोष्टी शिकतील,म्हणून मालती बाई रोज सकाळी मुलांना शिकवायला येत असत,पण देवदासींना काही फरक पडणार नाही हा ठाम विश्वास गावकर्यांना होता,सुमी ला हे पाटील घरात असे पर्यंत आत जाता येणार नव्हते कारण दार आतून बंद केले होते.सुमी पाटील घरा बाहेर जाण्याची वाट पहात बाहेरच थांबली. थोड्या वेळाने ते निघून गेले. तशी सुमी घरात आली आई ला म्हणाली,आई हे पाटील कशाला आपल्या घरी येतात, मला आवडत नाहीत ते. वसुधा बाई म्हणाल्या तुला नाही समजणार तू लहान आहेस आपला जन्म असाच आहे. तू मोठी झाली की तुला समजेल. आता गप्प जेव आणि परत हे विचारू नकोस. सुमीला आई चे बोलणे काही समजलेच नाही. दुसर्या दिवशी वस्ती वर मालती बाई शिकवायला आल्या,तेव्हा सुमीने बाई ना विचारले जे तिची आई बोलली होती,तेव्हा बाई म्हणाल्या सुमी तू तुज्या आई चे ऐकू नको तुला जे आवडत नाही त्याचा प्रतिकार कर पण या घाणेरड्या प्रथेला बळी पडू नकोस,मी जे बोलते ते तुला आज नाही पण तू उद्या मोठी झालीस की समजेल,. बाई ना सुमी ची तसेच इतर मुलांची पण काळजी वाटायची पण परिस्थिती पुढे त्या हतबल होत्या,आणि त्यांना कोणाचा पाठिंबा ही नव्हता त्यामुळे गप्प बसून जे होईल ते पहात राहणे इतकंच त्यांच्या हाती होते. सुमी आणि रामा लहान पणापासून एकत्र खेळत मोठे झाले,दोघे जिवलग मित्र होते. एकमेकांना ते आवडु लागले होते. दोघे ही वयाने चौदा वर्षाचे झाले होते,एकमेकांना एकमेकांची ओढ वाटत होती,पण याला प्रेम म्हणतात की अजून काही हे त्यांना उमजत नव्हते,नकळत्या वयात होते ते. सुमी वयात आली होती आता वसुधा बाई ना तिचे लग्न देवाशी लावून देण्याची घाई झाली होती. मंदिरातील पुजाऱ्याशी त्यांचे बोलणे झाले होते लवकरच त्या सुमी चे लग्न लावून देणार होत्या ,ती वयात आली तशी वसुधा बाई नी तिची शाळा बंद केली. सुमी फक्त लिहायला वाचायला शिकली होती. पण बाई जे बोलल्या होत्या ते ती विसरली नव्हती. एक दिवस चांगला मुहूर्त बघून सुमीचे लग्न देवाशी लावून दिले. तिच्या गळ्यात कवड्यांची माळ घातली,कपाळाला भंडारा लावला,एक परडी दिली त्यात देवी चा फोटो ठेवून तिला दारोदार जोगवा मागायला पाठवले,या मुळे गावातील लोकांना ही समजायचे की सुमी आता देवदासी झाली,ती फक्त पाटलांची पूजऱ्याची मालमत्ता झाली. सुमी रोज जोगवा  मागायला जायची,आईपुढे तिचे काही चालत नव्हते.पाटिल नेहमी सारखे घरी येत राहायचे,सुमीला विचित्र स्पर्श करायचे हपापलेल्या नजरेने पहात राहायचे,सुमीला हे सगळे असहय व्हायचे पण ती काही करू शकत नव्हती .रामा आणि सुमी एकमेकांच्या प्रेमात होते.सुमी सतरा वर्षाची झाली होती,रामा अठरा वर्षाचा होता त्याला पण देवाचा सेवक म्हणून देवळात कामाला ठेवले होते,त्याला ही लग्नाची मुभा नव्हती,देवाचा सेवक म्हणून आजन्म त्याने अविवाहित राहायचे ही प्रथा होती. सुमी आणि रामाला लग्न करायचे होते,पण इथून बाहेर कसे पडायचे हा मोठा प्रश्न होता,वसुधा बाई जोगवा मागायला बाहेर गेल्या होत्या सुमी एकटीच घरी होती,तिने रामा ला भेटायला बोलावले होते, सुमी म्हणाली,रामा ही लोक आपण जिवंत असे पर्यंत तरी आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत,आपण इथून पळून जाऊ तरच काही तरी होईल. मला हे असे देवदासी चे जीवन नाही जगायचे,तो पाटील असा पण माझ्या वर नजर ठेवून आहे मला त्याचीच जास्त भीती वाटते,रामा म्हणाला,सुमे पण आपण पळून जाणार तरी कुठे आणि खाणार तरी काय,कोण आपल्याला मदत करेल? सुमी म्हणाली,कुठे पण जाऊ पण या नरका पासून लांब जाऊ,,रामा ने तिला आपल्या मिठीत घेतले,,सुमीला आता मालती बाईंचे बोलणे आठवत होते तिने निर्णय घेतला की या नरकातुन बाहेर पडायचे , याचा प्रतिकार करायचा,ते दोघे शांत एकमेकांच्या मिठीत बद्ध होते तितक्यात वसुदा बाई आल्या,,आणि या दोघांना अशा अवस्थेत बघून ओरडलल्या,सुमे काय चालयय तुझं,काही लाज लज्जा आहे का, आई च्या आवाजाने सुमी रामा पासून दूर झाली,रामा बाहेर पळुन गेला. वसुदा बाईनी सुमीच्या कानशिलात वाजवली म्हणाल्या,अगं देवाशी तुझं लग्न झालंय,याच तरी भान ठेव तू जोगतिन आहेस तुला आयुष्यभर देवी ची सेवा करायची आहे, तशी सुमी म्हणाली,मला नाही व्हायच तुझ्या सारख नाही बनायचं  देवदासी मला लग्न करायचं रामा सोबत आमचं प्रेम आहे एकमेकांवर,,,इतके ऐकून वसुदा बाईनी सुमीला मरमर मारले,आणि बाहेर पडायचे नाही अशी सक्त ताकीद दिली,सुमी मुकाट्याने रडत होती आणि आपल्या नशीबाला कोसत होती.

रात्री पाटील घरी आला,वसुधा बाई नी त्याला जेवण दिले,सुमीला ही जेवणाचे ताट दिले पण तिची भूक मेली होती,,ती तशीच न खाता झोपून गेली. भर रात्री कोणाच्या तरी स्पर्शाने तिला जाग आली,डोळे फाडून ती दिव्याच्या उजेडात पाहू लागली तर तिला पाटील दिसला,तो तिच्या शरीराची लगट करत होता,तिने आईला हाका मारल्या पण तिची आई नव्हती घरात,तिने खूप प्रतिकार केला पण पाटला पुढे तिचा निभाव नाही लागला,सकाळी तिला जाग आली तेव्हा आई घरात होती तिने आईला झाला प्रकार सांगितला,तशा वसुधा बाई म्हणाल्या,आपल्या जन्मात हेच लिहिले आहे जे मी केले तेच तुला ही करावे लागणार आहे. सुमीला काय करावे हेच समजेना,इथून सुटका कशी करायची याचा ती विचार करू लागली,दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधा बाई अंघोळी ला गेल्याचे बघून सुमी  घरातून बाहेर पडली आणि रामाच्या घरा जवळ जाऊन त्याला आवाज दिला,रामा बाहेर आला ,काय ग सुमे इतक्या सकाळी सकाळी,,काय झाले अरे आता बोलण्यात वेळ घालवू नकोस,,चल आपण हे गाव सोडून पळून जाऊ आणि लग्न करू. तसा रामा म्हणाला,अग पण जायचे कुठे,,कुठे ही जाऊ पण आता लवकर निघ. रामा म्हणाला,थांब आलोच,,आणि घरात जाऊन त्याने थोडे समान घेतले आईला या बद्दल कोणाला सांगू नकोस असे बजावून बाहेर आला,सुमी आणि रामा भरभर वेशी पर्यंत आले अजून दिवस उगवायला वेळ होता. ते लवकरात लवकर हे गाव सोडणार होते. पण अचानक त्यांच्या समोर पाटील आणि गावचा पुजारी समोर आले,त्या दोघांना थांबवत म्हणाले काय कुठून पळून चालला होता? धरा रे या दोघाना असे पाटील म्हणाले तसे त्याची माणसे काठ्या हातात घेऊन समोर आले आणि सुमीला आणि रामाला पकडले. सुमी ला कळून चुकले की तिच्या आई ने च पाटला ला ही खबर दिली असेल. रामाला लोकांनी खूप मारले,सुमी ला पाटील घरी घेऊन आले ,सुमी च्या आईने तिला ही खूप मारले,सुमी मार खात होती आणि म्हणत होती मार मला कायमचे मी जिवंत राहून अशी देवदासी म्हणून जगणार नाही, तिची आई म्हणाली,मग काय लग्न करून देवीचा शाप घेणार हायेस,इथं तुला देवदासी म्हणून किंमत तरी आहे पोटाला अन्न आहे बाहेर जाऊन कोण तुला काय देणार ,,उलट सगळ्यांनी देवदासी म्हणून तुझा वापरच केला असता,सुमी म्हणाली,इथं राहून पण तेच होणार आहे,मला रामाशी लग्न करायचं आहे आई मला जाऊ दे सोड,,पण तिचे ऐकायला तिथे तिची आई नव्हती तर ती सुद्धा एक जोगतीनच होती,रूढी परंपरा याच्या नावा खाली दबलेली,!! सुमी चे आयुष्य देवाच्या नाव खाली पुजारी पाटील यांची भूक भागवण्यातच जाणार होते,इथून तिची सुटका नव्हती. रामा परत गावात दिसला नाही त्याचे काय झाले हे कोणालाच समजले नाही,,सुमी दारोदार जोगतिन बनून जोगवा मागत फिरते .,,,,

समाप्त,......

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel