मैडम एक पेशंट आला आहे ख़ुप सिरीयस कंडीशन आहे . नर्स ने डॉ. मैथिली ला सांगितले. तसे मैथिली केबिन मधून बाहेर पडली आणि त्या पेशंट कड़े आली. त्याला बघुन एकदम तिला धक्काच बसला खोल गेलेले डोळे,क्षीण झालेला चेहरा एकदम अशक्त असा तो त्याच्या कड़े तिला पाहवेना पण डॉक्टर होती ती मनावर संयम ठेवून त्याला चेक केले तिने. तो हलकाच हसला तिच्या कड़े बघुन. हसायला ही ताकद नव्हती त्याच्या कड़े. मैथिली ने त्याचा एक्सरे काढ़ायला नर्स ला सांगितले. त्याला खोकला ही जास्त होता. त्यात कोरोना चा संसर्ग असन्याची दाट शक्यता मैथिली ला वाटत होती. एके काळी त्याच्या वर जीव ओवाळून टाकायला मागे पुढे न बघनारी मैथिली आज तिच्या मोहित ची ही अवस्था पाहु शकत नव्हती. कुठे तो पाणीदार टपोऱ्या डोळ्यांचा मोहित आणि आज हा असा ? मैथिली तिथे थांबु नाही शकली. आपल्या केबिन कड़े आली. तिच्या डोळ्यातुन अश्रु येवू लागले. कोणी अस आपल्याला रडता ना बघू नये म्हणून ख़ुप संयमाने तिने अश्रु रोखले. दोन वर्षात मोहित ची ही अवस्था का झाली असेल? त्यांच् तर लग्न झाल होत मग? ती तिच्याच विचारात हरवली . 

मीतु बोललो ग घरी ख़ुप मनवन्याचा पर्यन्त केला आई ला पण आई समजून घेतच नाही . तू नुसती एम बी बी एस असतीस तर गोष्ट वेगळी होती. म्हणजे काय मोहित मुलीं नी पुढे जायची यशस्वी व्हायची स्वप्न बघायची नाहीत का? आज एक शिकलेली  सुशिक्षित मूलगी आपले करियर आणि घर दोन्ही व्यवस्थित सांभाळु शकते. मीतु मला मान्य आहे ग सगळ पन माझे आई वडील जुन्या विचारांचे आहेत त्यांना आपली सुन एक आय सी यू कंस्लटनट म्हणजे त्यांना पचनी नाही पड़त मे बी तू घरा कड़े माझ्या कडे दुर्लक्ष करशील अस वाटते. मोहित माझा निर्णय ठाम आहे मी ही परीक्षा देणार आहे तू ठरव तुला मी हवी आहे की नको . नाहीतर तुझा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. मीतु आय एम सॉरी आय कान्ट . मला आई वडिलांच्या पुढे नाही जाता येणार. ओके मोहित पन प्रेम करताना पन जर तुज्या आई वडिलांचा विचार केला असतास तर आज ही वेळच आली नसती. 

या वर मोहित कड़े बोलायला काहीच शब्द नव्हते. दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. मोहित चा नकार मीतु ने ख़ुप धिराने पचवला तिने डॉक्टर होऊन समाज सेवा करण्याच व्रत अंगीकारले होते ते अस मधुनच सोडण्या साठी नाही. तिने सगळ काही बाजूला सारून जोमाने पुढचा अभ्यास सुरु केला आणि डॉ. मैथिली साने. आय सी यू कंसल्टनट ही पदवी मिळली. गेली दोन वर्ष तिला मोहित बद्दल काहीच माहिती नव्हती फ़क्त एका कॉमन फ्रेंड कडून त्याच लग्न झाले चे समजले होते. आणि आज असा तिच्या समोर अनाहूत पणे तो आला होता. संध्याकाळी मोहित चे रिपोर्ट आले त्याचे लंग्ज कामातुन गेले होते. ड्रिंक आणि स्मोकिंग मुळे त्याला फुफुसाचा कॅन्सर झाला होता. रिपोर्ट वाचून मीतु चे डोळे भरून आले. त्यात भर कोरोना ही झाला होता. मोहित यातून बरा होईल की नाही काहीच सांगता येत नव्हते. नर्स ला त्याला द्यायची मेडिसिन सांगून मैथिली घरी आली. फ्रेश होऊन चहा घेत होती. मीतु त्या सातव्या मजलया वरचे पाटील काका काकू दोघ ही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना हॉस्पिटलाइज केले आज. आई या आजारचे काही सांगता येत नाही तू आणि बाबा काळजी घ्या. अजिबात बाहेर पडू नका. मीतु तुज्या बाबांना सांग उगा आपल रोज संध्याकाळी गार्डन मध्ये जावून बसतात. बाबा कशाला जाता तुम्ही बाहेर तुम्हाला डायबिटीज सुद्धा आहे. मीतु बाळा अग सोसायटीच्या गार्डन मध्ये बसतो आम्ही दोघ तिघ असतो फ़क्त ते ही अंतर ठेवून बसतो. तरी पन बाबा काळजी घ्या. तू आहेस ना बाळा डॉक्टर मग काही होत नाही मला. हे अस बघ मीतु सगळी मस्करीच वाटते यांना. कसला हा आजार आला  देव् जाणे! मीतु मग रूम मध्ये आली. मोहित ची आठवण मनातून जात नव्हती. काय झाल असेल त्याच्या आयुष्यात   की तो इतका ड्रिंक आणि स्मोकिंग करु लागला? पूर्वी कधी त्याने ड्रिंक आणि स्मोकिंग केले चे मला आठवत पण नाही. आमचा ब्रेकअप झाला म्हणून मोहित असा नाही तो इतका लेचापिचा नव्हता त्याला त्याच्या आई बाबांची ख़ुप जास्त काळजी होती मग काय घडले असेल? मीतु या विचारातच झोपी गेली. सकाळी हॉस्पिटल मध्ये रॉउंड ला गेली. मोहित ला चेक केले रिपोर्ट बद्दल फ़क्त कोरोना झाला आहे अस सांगितले. मेडिसिन ने बरा होशील अस त्याला दिलासा दिला. मीतु आज ही तशीच आहे जेव्हा मला सोडून गेली नाही तिने नाही मी सोडले तिला आणि आयुष्याची नासाडी करून घेतली. आज मीतु चा कीती रुबाब आहे थाट आहे ही मीतु आज माझी बायको असती जर मी तेव्हा आई च्या विरोधात गेलो असतो तर. मोहित डोळे मिटुन हा विचार करत होता. मीतु पेशंट चेक करत होती. मैडम तुम्हाला कॉल आला आहे तुमच्या घरून लैंडलाइन वर नर्स बोलली. मीतु ने आपला मोबाइल चेक केला तो साइलेंट असतो पण त्यावर मिस कॉल ही नव्हता. ती केबिन मधये आली आई चा फोन होता तिच्या बाबांना अचानक ताप भरला होता. तिने आई ला बाबांना घेवून हॉस्पिटल ला यायला सांगितले. बाबांना तिने चेक केले . ताप साधा वाटत नव्हता मग कोरोना टेस्ट केली तर पॉझिटिव्ह निघाले. बाबांना तिथेच तिने एडमिट केले. आई ला घरी जायला सांगितले. नर्स कोणाचा फोन होता मैडमनां मोहित ने विचारले. त्यांच्या आई चा होता . ओके नर्स मला एक पेपर आणि पेन मिळेल का ? हो मी देते आणून म्हणत नर्स गेली. मोहित ला आतुन हे फील होत होते की तो जास्त दिवस आता नाही जगनार. आपल्या बद्दल मीतु  ला जाणून घ्यायचे आहे हे तिच्या डोळ्यातले प्रश्न मला दिसतात पन इथे ती माझ्या शी बोलू नाही शकणार म्हणुन मी तिला पत्र लिहनार आहे अस मोहित ने ठरवले. नर्स ने त्याला पेपर पेन दिला. इकडे बाबांची तब्येत ख़ुप जास्त बिघडत चालली होती. मीतु ला समजत नव्हते काय करावे. तिच्या सरांनी पण बाबांना चेक केले मेडिसिन बदलून दिले पण काही फरक नाही पडला. मीतु चे बाबा तिला कायमचे पोरके करून गेले. मीतु वर दुःखाचा डोंगर कोसळला मोहित तिला केबिन मध्ये भेटायला आला. सॉरी मीतु मी तुला इथे भेटायला आलो पण जे झाल ते खरच ख़ुप वाईट झाल सव्हताला सावर आणि आई ला पन सांभाळ. हो मोहित मी एक डॉक्टर आहे मला माझ्या भावनां पेक्षा माझ कर्तव्य प्रथम आहे याची जाणीव आहे. तू ठीक आहेस ना मीतु? हो आय एम फ़ाईन तू काळजी घे मोहित. पुढे तिला त्याच्याशी ख़ुप काही बोलायचे होते पण नाही बोलू शकली. मोहित ने ओळखले मीतु तुझ्या सगळया प्रश्नाची उत्तरे तुला मिळतील त्या शिवाय मी  मरनार नाही. मोहित स्टॉप धिस नॉनसेन्स. मोहित आपल्या बेड कड़े आला. मीतु बाबांच्यां जान्याने ख़ुप दुखी होती. मोहित ने लग्नाला नाही बोलले त्यानन्तर तिने आई बाबां साठी आणि लोकांच्यां सेवेत आयुष्य घालवायचे ठरवले होते आता बाबा नाही राहिले आई साठी तिला मन घट्ट करने गरजेचे होते. मीतु चार दिवस हॉस्पिटल ला जावू नकोस आई म्हणाली. आई पेशंट ख़ुप आहेत कोरोना ही अवाक्या बाहेर चालला आहे. मी घरी बसून नाही राहु शकत. हो मला समजते पण फ़क्त चार दिवस आपल्या आई साठी . बर आई थांबते मी . मितुला आई ची मनस्थिति समजत होती. दोन दिवस झाले होते मीतु घरी होती पन हॉस्पिटल मधले अपडेट घेत होती. मोहित ची तब्येत आहे तशीच होती. रात्री तिला हॉस्पिटल मधुन फोन आला. मोहित ची तब्येत जास्त बिघडली होती. ती तड़क तिकडे आली. मोहित कड़े बघण्याची तिची मानसिकता नव्हती पण डॉक्टर म्हणुन तीच कर्तव्य भाग पाडण गरजेचे होते. मोहित चे हार्ट बिट्स ख़ुप वाढ़ले होते अचानक त्याचा श्वासोश्वास जोर जोरात होऊ लागला. त्याने मीतु चा हात हातात घेतला  सॉरी फ़ॉर वन्स अगेन डॉक्टर.. आणि हसत हसत मोहित ने आपला दम सोड़ला. मीतु चे डोळे भरून आले ती तड़क तिथुन निघाली ती मोहित ला अस बघुच शकत नव्हती. आज तिचा मोहित खरया अर्थाने तिला एकट करून गेला. बाबा गेले आणि आता मोहित ही यालाच पोरक होण म्हणतात का? मैडम एक मिनिट नर्स ने तिला आवाज दिला . ती थाम्बली. मैडम ही चिठ्ठी ते मोहित त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितली होती . मीतु ने चिठ्ठी घेतली आणि घरी आली. आधाशा सारखी ती वाचू लागली. मीतु तू जेव्हा ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. मी तुझा गुन्हेगार आहे ग. तुझ प्रेम मी लाथाडले त्यामुळेच मला आज ही शिक्षा मिळाली. तुला नकार दिला आणि आई ने जबर्दस्ती ने मामा च्या मूलीशी  नयन सोबत माझ लग्न लावून दिले मामाची मूलगी एक नम्बर हट्टी आणि लाडवलेली मला अजिबात पसन्द नव्हती पन आई ने जीव द्यायची धमकी दिली म्हणून मी लग्न केले पण बायको म्हणुन नयन ने मला कसलेच सुख नाही दिले कारण तिने तुझा फोटो माझ्या कपाटात बघितला होता. ती सतत मला टॉर्चर करत राहिली. मी तिच्या जवळ गेलो तर अंगाला हात लावशील तर पोलिस कम्प्लेंट करेन अशी धमकी द्यायची. यातूनच मग मी ड्रिंक आणि स्मोकिंग करू लागलो  माझ्या आयुष्याची बर्बादी झाली होती. तुझी ख़ुप आठवण यायची पण भेटनयाचे धाडस नाही झाले. तू तुझ्या आयुष्यात पुढे निघुन गेली असणार मग मी का तुला अजुन त्रास द्यायचा असा विचार करून गप्प राहायचो. तुला कधीही विसरलो नाही मीतु तू कायम माझ्या हृदयात होतीस. तुझ्या आठवणी वर जगत होतो. आयुष्याचा वीट आला होता पण एकदा तुझी भेट व्हावी अस मना पासून वाटत होत आणि आपली भेट झाली . तुला इतकी मोठी डॉक्टर झाल्याचे बघुन ख़ुप अभिमान वाटला मला. मीतु आय एम सॉरी आता पुन्हा एकदा तुला सोडून जात आहे. माझी अवस्था बघता मी जास्त दिवस जगेन अस वाटत नाही. मीतु माझ्या शेवटच्या क्षणी तू जवळ असावीस बस्स मी मग आनंदाने माझे प्राण सोडेन. आय लव यू मीतु काळजी घे. ....मोहित.   

मीतु ख़ुप रडत होती मोहित आय लव यू टू . तू परत ये रे आय नीड यू मी ख़ुप एकटी पडली आहे मोहित प्लीज़ कम बॅक. हूंदके देवून ती रडत होती. तशीच  कधीतरी तिला झोप लागुन गेली. सकाळी ती उठली मोहित च पत्र बाजूलाच होते ते तिने कपाटात ठेवले. तिला हॉस्पिटल मधुन फोन आला. आई मला हॉस्पिटल ला जावे लागेल म्हणत ती तयारी ला लागली. भावने पेक्षा कर्तव्य महत्वाचे  हे तिला माहित होते. बाबा,मोहित यांच्या आठवनी च्यां पसाऱ्यात तिला अड़कुन चालणार  नव्हते.

समाप्त 

©® Sangieta Devkar 2017

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel