प्रेम..
प्रेम ही एक सुंदर भावना असते ..
मनाला सावरणारी आणि नात्याला जपणारी नाजूक दोरी असते ..
प्रेम म्हणजे तिच्या डोळ्यातील मिश्किल हास्य ..
प्रेम म्हणजे त्याच्या आठवणींचे गोड रहस्य ..
प्रेम म्हणजे तिला पडणारी अगण्य रम्य स्वप्नं..
प्रेम म्हणजे त्याला पदोपदी साथ देणं..
प्रेम म्हणजे तिला आनंदी पाहून तो स्वतः आनंद साजरा करणं..
प्रेम म्हणजे त्याची आतुरतेने वाट पाहणं..
प्रेम म्हणजे तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते करणं..
प्रेम म्हणजे त्याच्यावर आईसारखी माया करणं ..
प्रेम म्हणजे कठीण परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीर उभं राहणं..
प्रेम म्हणजे त्याची उद्दिष्ट्ये गाठण्यात त्याला प्रोत्साहन देणं ..
प्रेम म्हणजे रोज नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडणं..
प्रेम म्हणजे एकमेकांतली मैत्री सदैव जपणं ..
प्रेम म्हणजे आयुष्यभर तिने त्याला आणि त्याने तिला सोबत देणं ..
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.