प्रत्येक भाषा गाजवू पाहते स्वतःचीच हुकुमत .. 

चला पाहूया शब्दांची एक न्यारी गंमतजंमत … 

 

Romeo ने Juliet ला दिले red rose .. 

देई तो तिला ते आज उद्या आणि रोज .. 

 

boss जेव्हा खेकसतो "do it right now !!".. 

कोसळताना दिसते तेव्हा career ची नाव .. 

 

college नंतर हिंडत असते सुजाता by the lake .. 

आई घरात बोंबलत असते "राहिली कुठे माझी लेक .. !!!"

 

तसे श्याम काका आहेत आमचे भलतेच funny .. 

आज आठवडा झाला तरी नाही सापडत आहे त्यांना त्यांची हरवलेली फणी .. !!!!

 

शेवटचा तास संपताच प्यायचा असतो दिनेशचा famous soda .. 

मुले गुरुजींना विनवणी करतात "मास्तर , आज तरी लवकर सोडा !!!"

 

office वेळेत गाठण्यासाठी संगीता पकडते मिळेल ती bus .. 

शेजारचा राहुल तिला लिफ्ट offer करत म्हणतो "अगं , कधीतरी माझ्या bike वर बस ... !!!"

 

काव्यरचना करण्यात तशी नवीनच आहे मी .. 

जर कुणी माझ्या या कवितेमुळे दुखावला असेल तर "please , forgive me .. !!!!"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel