सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या आतच उठायचं असतं ..
अलार्म होताच झोपेतून जागं व्हायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
कसबसं READY होऊन घर सोडायचं असतं ..
आज तरी BUS मध्ये SEAT मिळेल या आशेने BUS-STOP वर जायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
काही करून ९ च्या ठोक्याला OFFICE गाठायचं असतं ..
आणि त्या अत्यंत उद्धट आणि उर्मट अशा BOSS कडे पाहून ..खोटं खोटं का होईना ..हलकेच हसायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
कामाचा LOAD असो वा नसो ..BOSS आपल्या कामावर खूष असो वा नसो ..
GIRLFRIENDला मात्र दिवसातून सतराशे साठ वेळा WHATSAPP वर MISS करायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
LUNCH-TIME आणि COFFEE-TIME मध्येच काय तो TP करायला वाव मिळत असतो ..
पण तेव्हा सुद्धा मित्रांचे ते रटाळ आणि पाणचट विनोद ऐकून पोट भरायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
संध्याकाळ झाली की मात्र डोक्यात विचारांचा काहूर माजलेला असतो ..
कारण BOSS च्या आधी त्याची नजर चुकवून ..आपल्यालाच OFFICE मधून सटकायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
आता कुठे उरलेला दिवस जणू आपल्या हक्काचा असतो ..
BUS मध्ये एक छोटीशी झोप काढण्यासाठी खिडकीजवळ जाऊन बसायचं असतं ..
परंतु बाजूला बसलेल्या मित्राच्या PROBLEMS चा LOUDSPEAKER सतत सुरूच असतो ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
घरी पोहोचता पोहोचता जीवात जीव नसतो ..
जेवण उरकून लगेचच दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागायचं असतं ..
आणि घरच्यांशी संवाद साधायला मात्र जरा सुद्धा वेळ नसतो ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
आता उरले SATURDAY आणि SUNDAY ..
या २ दिवसात कधी मित्रांना भेटायला जायचं असतं ..तर कधी FAMILY सोबत फिरायला जायचं असतं ...
आणि या सर्व व्यापातही स्वतःच्या HOBBIES ना मात्र जपायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..
खरंच ..
इवल्याशा आयुष्यात आपल्याला बरंच काही हवं असतं ..
स्वतःपेक्षा आपल्या जीवलगांच्या आनंदासाठी आधी झगडायचं असतं ..
म्हणूनच तर LIFE मध्ये TENSION असतं ..