मनोजच्या घरी लोकं जमली आहेत. त्याच्या काकांनी आत्महत्या केली आहे. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मनोजला त्याचा बाप विश्वनाथ शेतात कामाला येत जा, थोडक्यात शेतीचं महत्व सांगतात. पुढे काॅलेजमधे जाण्यासोबत अधूनमधून मनोज शेतातली सर्व कामे शिकतो. काही दिवस पुढे गेल्यावर गावात पाण्यासाठी दूर जाणं, रातोरात जागणं हे मनोज, रोहण व अभी यांच्या घरात सुरू होतं, काही घरांच्या बोरला थोड पाणी शिल्लक असतं. रोहण गावात किराणा दुकान चालवत असतो. तरीदेखील त्याच्या घरावर कर्ज असतं. अभीची गावात टपरी असते. अभी वरून सोज्वळ पण आतून आतल्या गाठीचा असतो. एके दिवशी मनोजचे बाबा शेतातली वीज डी.पी. नीट करताना अचानक शाॅक लागून जागीच दगावतात. त्यांच्या मृत्यूनंतर मनोजची चुलत बहीण राधा ( १०वीत असते.) व घरातल्या सर्व गोष्टींची जबाबदारी मनोजवर येऊन पडते. पहिला एक दिवस मनोज त्याच्या शेतात जाऊन भरपूर रडतो. पण मन खंबीर करून एका मार्गावरून चालायच ठरवतो.
           इकडे अभीची एका अंकिता नावाच्या मुलीसोबत नजरभेट होऊन प्रेमप्रकरणास सुरूवात होते. मनोज तालुक्याला जाऊन काम व शेत दोन्हीत व्यस्त होऊन जातो. इकडे रोहण वयात आल्याने आई-बाबा चिंतेत असतात. शेती व किराणा यावर त्याच्याशी लग्न करायला सहसा मुली तयारच होईनात. रोहणसोबच त्याच्या पाच-सहा मित्रांची हीच परिस्थिती झाल्याने प्रत्येकाची चिंता वाढलिये. मनोज पावसाबाबत चिंता करत घरात बसलायं. थोड्या दिवसात मनोजची पहिली पेरणी वाया जाते, त्या रात्रीत मनोज असह्य होऊन रोहण व अभीला ढाब्यावर नेऊन दारू पितो. त्याच गावात रोहिणी नावाची मुलगी असते. जी त्या ढाब्यावर काम करत असते. रोहिणी काही दिवस आधीपासूनच मनोजला शेतात राबवताना बऱ्याचदा दुरून पहात असते. सकाळ होताच रोहण व अभी गडबडीत गावात निघून येतात. मनोज तिथेच राहतो. पुढे तिथेच पहिल्या भेटीत रोहिणी मनोजची समजूत घालून त्याला घरी पाठवते. मनोज घरी येऊन शांत बसून विचार करून नव्याने शेतीत कस लावायचा ठरवतो.
          रोहणचं कर्ज काही केल्या कमी होतं नसतं व किराणा दुकानही चालेनासं होतं; रोहणच्या घरी वाढलेल्या कर्जावर व लग्नावर पुन्हा चर्चा रंगते. अभी टपरी नेटाने चालवून मात्र दोन मजली घर ऊभा करतो. गावात त्याची बरीच वाहवाही होते. मनोज यावेळी आयडिया वापरून कमी पाण्यात उत्पन्न काढायच्या मार्गी लागतो. यावेळी रोहिणी त्याला सोबत शेतात जाऊ लागते. नकळत दोघांची प्रेमकहानी सुरू होते. त्या वर्षी पीक चांगल काढून मनोज घरावरील पूर्ण कर्ज फेडतो. थोड्या दिवसात त्याची बहिण राधाच्या लग्नाची लगबग सुरू होते. मनोज थोडी मदत घेऊन लग्न छानपैकी उरकून देतो. त्या लग्नात एक मेख घडते. रोहिणीचं व मनोजचं काही आहे; हे मनोजच्या आईला समजतं. पण मनोज तात्पुरता दिलासा देऊन प्रकरण निभावून नेतो.
             काही दिवस अभीचे अंकीतासोबत प्रिती निघून जातात. अचानक अवर्षणाने पाऊस होऊन गावातल्या सर्वांच्या पिकांच नुकसान होतं. शेते पाण्याखाली जातात. शेतकऱ्यांवर पैसा कसा ऊभा करायचा? ही पंचाईत येऊन पडते. इकडे काही नऊ-दहा म्हाताऱ्या लोकांच गावात नेत्याकडून मंदिर बांधण्याविषयी भरपूर उठाठेवी चालू होतात. गावावर संकट असताना मात्र गावचा सरपंच गोवा फिरायला गेलेला असतो. गावावर हडळ बसली हे ठरवून गावात दहा दिवस अंधश्रद्धेचं प्रमाण वाढतं. पण मनोज पुढाकाराने हे प्रकरण हानून पाडतो.
                पुढे दिवस सरतात नई परत दुष्काळ पडतो. यावेळी दुष्काळाची तीव्रता मात्र भयंकर असते. बरीच घरं शहरात स्थलांतर करून जातात. रोहणही निघून जातो. काही घरं थेट शेती "एकरावर" विकायला काढतात. शेती विकून तालुक्यात व्यवसाय करता येईल; ही मानसिकता बनते. पैसे भरून सरकारी नोकरी लावं अश्या आरोळ्या/अफवा चालू होतात. आंध्रात स्थलांतर प्रचंड वाढतं. रेल्वेभरती निघते तर गावेच्या गावे त्यासाठी तुटून पडतात. मनोज प्रत्येकाची हतबलता रोज पहात असतो. टिव्हीवर मात्र सरकार त्या जिल्ह्य़ातील गावांबद्दल काहिच बोलायला तयार नसते. अशातच मनोजचे रोहिणीच्या भावासोबत जबर मारहाण होते. पुढे मनोज व रोहिणी एक युक्ती आखतात. मनोज जिल्ह्यात तरूणाई एकत्र जमवतो. एका मैदानावर सर्व फ्लेक्स लावून बसतात. "एकरावर जमीनी विकणे आहे", हे आगळवेगळ आंदोलन पूर्ण न होता एक जिवंत प्रश्न सोडून निघून जातं. मराठवाड्याला वाली उरला नाही, ही खंत सांगून जातं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel