किरण दहिवदकर
मला अभिमान असे सखे
तुझ्या या निश्चयांचा
भारतीय नारी म्हणुन
तुला गौरविण्याचा...
मला अभिमान असे सखे
तुझ्या त्या आहुत्यांचा
दुःखाच्या यज्ञात केलेल्या
सुखांच्या स्वःहाचा.
मला अभिमान असे सखे
तुझ्या त्या भुमिकेंचा
भावनांपेक्षा तु महत्त्व
दिलेल्या त्या कर्तव्यांचा
मला अभिमान असे सखे
तुझ्यातील संयमाचा
आपले सुख इतरात
शोधण्याच्या तुझ्या वृत्तीचा
मला अभिमान असे सखे
तुझ्या चारित्र्याचा
इतरांसमोर आदर्श
म्हणुन मांडण्याचा.
मला अभिमान असे सखे
आज माझा स्वतःचाच
काही क्षण का होईना
तु माझी असल्याचा…
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.