दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती
यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
जिथे विपत्ती जाळी,
उजळीनिसर्ग-लीला निळी
काजळीकथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी त्यक्त,
बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.