अनंता तुला कोण पाहु शके तुला गातसा वेद झाले मुके मतीमंद अंधा कसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला असेतुझा ठाव कोठे कळेना जरीगमे मानसा चातुरी माधुरीतरू वल्लरींना भुकी मी पुसे तुम्हा निर्मिता देव कोठे वसे फुले सृष्टीची मानसा रंजिती घरी सोयरी गुंगविती मतीसुखे भिन्नही येथे प्राणी चुकेकुठे चिन्मया ऐक्य लाभू शके तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुलाकृति गावया रे कळेना मला भुकी बालका माय देवा चुके तया पाजुनी कोण तोषु शके नवी भावपुष्पे तुला वाहिली तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरोप्र्भू कल्पना जल्पना त्या हरो
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.