भवळा गाईचें गाणेंसाता नदाच देऊळ।    डुबा कोपानं उडाला ।गाई जन्मिली भवळ    जाऊन कासेला भिडला ।चारा नेहरी चरली ।    वाचा फुटली डुबियाला ।पाणी प्याला उतरली ।    डुबा:-देखिली वनींच्या वाघांनी ।    "अग अग भवळाबाई ।वाघ: -    रोजचा पान्हा अमृताचा ।"खावं खावं भवळा तुला ।    आजचा पान्हा रगताचा "भवळा: -    भवळा-"नको खाउं वाघा मला ।"    "काय सांगूं डुब्या बाळा ?।घरीं माझा डुबा तान्हा ।    चारा नेहरीं चरलें ।त्याला देईन पहिला पान्हा।    पाणी प्याया उतरलें ।मग खार वाघा मला ।"    देखिलं वनीच्या वाघानं ।भवळा वासराकडे जाते-    "खाऊ खाऊ भवळा तुला" ।भवळा तेथून निघाली ।    "नको खाऊ वाघा मला "।लागली वनाच्या वाटला ।    "घरीं माझा डुबा तान्हा " ।एक वन वोलांडिलीं ।    त्याला देईन पहिला  पान्हा ।दुसर्‍या वनाला लागली ।    भवळा व डुबा दोघेही वाघाकडेदोन वनं वोलांडिलीं ।    जातात -तिसर्‍या वनाला लागली ।    डुबा तेथून निघाला ।तीन वनं वोलांडलीं ।    लागलीं वनाच्या वाटला ।चौथ्या वनाला लागली ।    एक वन वलांडिलं ।चौथ्या पांचव्या वनाला ।    दुसर्‍या वनाला लागलीं ।डुबा बाळानं देखिली ।    दोन वन वलांडिलीं ।तोडलं सोनीयाचं दावं ।    तिसर्‍या वनाला लागलीं ।उपटलीं रुपीयाचीं नखं ।   तीन वनं वलांडिलीं ।चौथ्या वनाला लागलीं ।    माझ्या भवळाची पाठ ।चौथ्या पांचव्या वनाला ।    जशी पंढरीची वाट ।गेलीं वाघाच्या जवळीं ।    माझ्या भवळाचं पोट ।डुब्या बोलतो वाघाला ।    जशी कापसाची मोट ।डुबा -    माझ्या भवळाची कास ।"आधी खार वाघा मला ।    माझ्या भवळाच्या धारा ।मग खार भवळाला । "    सोनियाच्या तारा ।भवळा -    माझ्या भवळाची शेप ।नागीण टाकी झेप ।"आधी खार वाघा मला ।    माझ्या भवळाच्या मांडया ।मग खार डुबियाला ।"    जशा पालखीच्या दांडया ।वाघ भवाळाला खातो-    माझ्या भवळाच दूध ।वाघ किराण साधिलं ।    जेवण माझं झालंय सूधं नरड भवळाचं फोडिलं ।    माझ्या भवळाचं दहीडुबा रडुंहि लागला ।    जेवण माझं झालंय लई ।डुबा आईवरुन गाणें गातो -    माझ्या भवळाचं तूप ।"माझ्या भवळाचीं शिंग ।    जेवण मला झालंय खूप ।महादेवा तुझी लिंग ।    माझ्या भवळाचं ताक ।माझ्या भवळाचे कान    जेवण मला झालंय पाक ।नागिलीग तुझें पान ।    माझ्या भवळाचं शेण ।माझ्या भवळाचं कपाळ ।    सारवील चारी कोनं ।आंत निजले गोपाळ ।    माझ्या भवळाच्या गोमुतानं ।माझ्या भवळाचा गळा । देव झालं पैतार " ।जसा तेलीयाचा नळा ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel