वसुदेव पायानं पांगळा ।रुपीण डोळ्यानं आंधळी ।अर तूं सरावण्या बाळा ।आम्हाला काशीला न्यावं ।सरावण तेथून निघाला ।गेला सुताराच्या वाड्या ।श्रावण -"अर तूं सुतार भैतर ।माझा मैतार होशील ।कावड करुन देशील ।आईबाप नेयाचे काशीला ।"कावड करुन बा दिली ।कावड घेतली खांद्यावरी । आला आपल्या वाड्याला ।श्रावण -"अग तूं सावित्री अस्तुरी ।कर ग बुती न भाकरी ।माता न्हाऊन घालावी ।पित्याला अंघुळ घालावी।आईबाप न्यायचे काशीला ।"सावित्री कायच बोलली ।सावित्री --"दोहीची मोटली बांधावी ।नेऊन नदीला सोडावी" ।सरावण काय च बोलला ।श्रावण"अग अग तूं पापिणी ।होशील वनीची वाघिणी ।होशील टॆकीची बाभळ ।"पेटीवल्या कातीव चुली ।माता न्हाऊं जी घातली ।पित्या अंघुळ घातली ।सरावणानं अंघुळ अष्टण केलं ।सरावण भोजन जेवला ।माताअ जेवूं जी घातली ।पित्याला जेवूं जी घातला ।दोघं कावडींत बसवली ।घेतली चवरंगी झारी ।कावड घेतली खांद्यावरी ।निघाला वाड्याच्या बाहेरी ।सरावण काय तो बोलला ।श्रावण -"अग तूं रुपिणी ग माता ।मला मोठा सकुन झाला ।आडवं मांजर ची गेलं ।"तेथून म्होरच निघाला ।आडव्या जळणाच्या मोळ्या ।श्रावण -" अर तूं वसुदेव पित्या ।मला मोठा सकुन झाला ।आडव्या जळणाच्य मोळ्या ।"निघाला येशीच्या मारगी ।एक वनं वलांडिलं ।दुसर्या वना सापासर्पाचं वेटोळ तेबी बन वलांडिलं ।तिसरं वन बा दारुण ।वाघ डारक्या फोडीत ।तेबी वन वलांडिलं ।चवथं वन बा दारुण ।राक्षिणी पीठ कांडीत्या ।तेबी वन वलांडिलं । गेला पांचव्या वनाला ।माता कायच बोलली । मात -"आम्हाला पाणी तूं पा जव ।"तिथं एक इरक्ष्याचं झाड ।कावड त्याला अडकीविली ।श्रावण पाणी आणण्यास जातो -घॆतली चवरंगी झारी ।निघाली तळ्याच्या मारगी ।ठाक झाडाला घालतो ।खुणा वाटनी करीतो ।खळोखळा जी रडतो । लगुरी धोंड्याच्य़ा रचीतो ।खुणा वाटॆनी करतो ।खळुखळा जी रडतो ।विटी गवताच्या वळीतो ।गेला तळ्याच्या पाण्याला ।दशरथाच्या बाणानें श्रावणाचामृत्यूझारी त्यानं बुडविली ।झारी बुडबुडा जी वाजली ।दशरथाच्या कानीं आवाजगेला ।त्या बाणाई सोडीला ।सरावणाच्या उरी वो लागला ।सरावण ‘राम राम ’ बोलला ।दशरथ काय च बोलला ।" ईकत मनुष्य बा गेलं ।रामराम कोण च बोललं ।"जवळ जाऊन पाहूं लागला -"अर देवा सरावण भाचा म्यांमारीला ।बाण काढाया लागला ।सरावण काय च बोलला ।"बाण माझा काढूं नका ।तिथं एक ईरक्ष्याचं झाड ।तिथ माझा मायबाप । त्याला पाणी जी पाजावं ।मग माझा बाण काढावा ।"दशरथ पाणी नेतो -घॆतली चौरंगी झारी ।निघाला कावडीच्या सुधी ।ठोक झाडाचं बघीतो ।खळॊखळां तो रडतो ।"सरावण भाच्या तुझा खेळ ।"विटी गवताच्या बघतो ।खळोखळा वो रडतो ।"सरावण भाच्या तुझा खेळ ।"लगुरी घोंडयाच्या बघतो । खळोखळा वो रडतो ।"सरावण भाच्या तुझा खेळ ।"आला कावडी जवळी ।मातेच्या तोंडा झारी लावीतो ।कोण आहे म्हणून बोलूं लागली ।दशरथ रडूं बा लागला ।"काय सागू बाई तुला ।सरावण भाचा म्यां मारिला ।कुंकू लेकीचं पुसलं । मग आई बाप पाणी पिईनात आईबाप दोघेही स्वत:ला मारुनघेतात.कावड त्यानं उचलली ।नेली तळ्याच्या पाऊला ।काढला सरावण्याचा बाण ।माईनं मारुन घेतला ।तिघेची तिघॆ मरण पावले ।तोडले चंदन हे वेल ।त्याला दिले आगीन वाट ।दशरथ रडूं वो लागला ।"सरावण भाचा म्या मारीला ।कुकू लेकीचं पुसलं ।"