जटाधारी जी गोसावी । यांनी जटा वाढवील्या ।यांनी नख वाढवीली । काखेंत झोळी जी घेतली ।हातीं भोपळं घेतील । अंगी विभूत चर्चिलं ।निघाला उधन्या नगराला । बिजली खेळत्या बाळाला ।तो विचारतो -सीतेचा वाडा दावून द्या ।बाळ उत्तर देतो -काचबंदी ज्या अंगण । दारीं धणीयाचं मेढ । तोही सीतेचा ।वाडा । गेला सीतेच्या वाडयाला । आलख म्हणून बोलला ।सीता म्हणते -राम गेलेत वंजाया । लक्ष्मण गेलेत पारधीला ।दशरथ सासरा पारावरीं । केगई सासू ओसरीवरीं ।इगडी गेलीया खेळाया । सीता बसली न्हायाला ।गोसावी म्हणतो -दारीं जटा मी तोडीन । दारीं नखं मी काढीन ।दारीं भोपळा फोडीन ।  दारीं झोळीजी फाडीन ।तुझ्या श्रीरामाचं सत्त्व येऊनी जाईन ।सीता न्हाऊनी ऊठली । नेसली  पीवळं पितांबर ।ल्याली जरभर चोळी । अंग भरल मोतीयानं ।निडाळ भरलं कुंकवानं । नेत्रं भरलीं काजळानं ।मुख भरलं तांबुळानं । लावली माळीयाला शिडी ।काढलं चौरंगी सुप । गेली पांच उतरंडी ।साळी डाळी जी काढिल्या । नेऊन योग्याला वाढल्या ।इगड्या नणंदानी देखील्या । राम आला वंजवुनी ।राम म्हणतो -अग तू सीता सुंदरी । घेग झारी देग पाणी । इगडी बोलती ।झाली । नको सीताचं पाणी । सीता जोगियाची राणी ।लक्ष्मण आलेत पारधीहुनी ।लक्ष्मण म्हणतो -अग तूं सीता सुंदरी । घेग झारी देग पाणी ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel