प्रिय मैत्रीण

तुझ्या पत्रातून तुझं अगदीच योग्य नाव सुचवलसं मला. "कल्पना" या नावाप्रमाणेच आपल्यातल्या नात्याला सुरुवात झाली. तुही जवळपास इयत्ता दहावीत असल्यापासून मी तुझी वाट पाहणारा एक मित्र अशी कल्पना केली होती; किंवा किमान तुझ्या स्वप्नात तसं काहीसं होत आणि इकडे मी माझी देखील तीच अवस्था पण खरोखर छान वाटतं आपण एकमेकांना निदान आता पत्रातून तरी भेटू शकतो. नाहीतर याआधी जी भेट व्हायची ती थेट इनव्हिजीबल वाटायची. मी विचार करायचो, ''एका शांत संध्याकाळी तू मस्तपैकी खुर्चीत बसून चहाचा आस्वाद घेत टेबलवर पान ठेवून माझ्यासाठी कविता लिहिते आहेस.'' आणि तुझा शब्द न् शब्द कागदावर अगदी कोरीव उमटतो आहे. तू सुद्धा माझ्याबद्दल तसाच विचार करायचीस. तुलाही रात्र फार आवडते लिहिण्यासाठी आणि मलाही. मला तुझ्याशी अजून भरपूर बोलायचं आहे. तर मी तुला पुन्हा भेटेल माझ्या पुढच्या पत्रात.

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel