प्रिय मैत्रीण

मी सहज बोलून गेलो. पण तरीदेखील तू मनावर घेऊन इतकी अप्रतिम काव्यरचना माझ्याकरता पत्राद्वारे पाठवलीस. विश्वास बसत नाही. खरच जेवढ वाटलं होतं त्यापेक्षा कैक पटींनी उत्तम लिहितेस तू. मीही एक दिवस तुला माझी कविता देईल. पण तू फ्लॅटमध्ये राहतेस हे ऐकून चक्क होश उडाले माझे. होय! कारण स्वप्नातल्या इतक्या सर्व गोष्टी जशाच्या तशा प्रत्यक्षात येत आहेत. तू एका खुर्चीत बसून टेबलावर लिहीत बसलेली असायचीस जेव्हा जेव्हा माझ्या स्वप्नात यायचीस. तुला लिहिताना समोर एक काळा संपूर्ण कागद नजरेच्या अगदी समोर ठेवायची सवय.... कारण तू स्वप्नात म्हणायचीस जिथे अंधार आहे तिथे प्रकाश निर्माण करायला खूप वाव आहे. तुझ्या त्या मांडणीच्या बाजूला एक खिडकी. बहुधा तरी तुझा फ्लॅट 14 किंवा 15 व्या मजल्यावर. नाही का? माझ्या स्वप्नात तू फ्लॅट मध्ये राहतेस एवढंच साम्य आहे की बाकीचही सर्व तसच आहे? आता मात्र तुला हे पत्रातून लवकरात लवकर कळवाव लागेल. मला आता स्वस्थता कळेपर्यंत लाभायची नाही. आतुरतेने वाट पाहतोय तुझ्या पत्राची.....

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel