प्रिय मैत्रीण

का नेमक असं होतय? हे मला कळायला वेळ लागतोय. पण मनात राहून राहून वाटतंय की, तू जरी मला लिहून व्यक्त होते आहेस; तरी पण तू आनंदी नाहीस. मला वाटतंय जणू एखाद्या जोकरप्रमाणे मी तुझी तात्पुरती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ठराविक वेळ संपल्यावर मात्र तू पुन्हा चिंताग्रस्त होतेस. तुझं चिंता करणं नेमकं का? व कोणत्या परिस्थितीशी जुळलयं?? हे मला तरी अजून समजू शकलेलं नाही. तू सांगितल्या शिवाय ते फारसं कळूही शकणार नाही. तुझ्या स्वप्नात येण्यासोबतच दररोज सायंकाळी अवकाशात एक तारा ठराविक वेळेत हजर असायचा. त्याची एक मोठी गंमत आहे, जी मला तुला प्रत्यक्ष भेटूनच सांगायची आहे. तरीदेखील तुझं अस्तित्व मी त्यात थोडसं पाहायचो, हे तुला आधीच सांगतो...... फार विचारात नको पडूस. तुला वाटेल कदाचित तो तारा वगैरे काल्पनिक किंवा भास असेल; पण खरंच तो तारा माझ्या आयुष्यात वास्तवात होता, आजही आहे. त्याची माझ्या नजरेत येण्याची वेळही आजवर बदललेली नाही. ते असूच दे. पण मला उत्तर हवयं तुझ्याकडून ते केवळ तुझ्या चिंतेचं. वाट पाहतोय, तुझ्या पत्राची तुझ्या उत्तराची......

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel