लहानपणीचे प्रेेम
सांगतो माझ्या पहिल्या प्रेमाची ❤कथा,
नीट वाचा आता.
आमचं घर होतं शेजारी-शेजारी 🏕🏠,
एकत्र खेळायचो,पावसात पळायचो,
एकत्रच पडायचो आजारी.
कधीकधी भांडणेही🤺 करायचो ,
ती माझ्या गच्चीला धरायची,
मी तिच्या केसांना धरायचो.
नंतर एकमेकांवर रुसायचो😥😌,
थोडावेळ बोलत नसायचो.
पण न बोलता मन जास्तवेळ थांबेना
म्हणतात ना, तुझं माझं जमना अन् तुझ्याविना करमना.
आम्ही शाळेतही मिळुनच 🚜जायचो,
सुट्टीत एकमेकांचा डब्बाही🍝🍜 खायचो.
हळुहळु वय वाढत गेले,
मैत्रीचे रुपांतर प्रेमात💞 झाले.
प्रेमाचा ईजहारही नाही केला,
तरीही प्रेमाचा आनंद घेतला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.