द ओल्ड मॅन अँड हिज गॉड: डिस्कवरींग द स्पिरिट ऑफ ईंडिया हे अतिशय साधे सोपे परंतु ह्रदयाला भिडणारे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलु वेगवेगळ्या लघुकथांमधुन मांडले आहेत. त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सुधा मुर्ती यांनी पाहिलेले माणसांचे उदारता आणि स्वार्थीपणा हे दोन वेगळे वेगळे चेहरे या पुस्तकात वाचायला मिळतील. तसेच स्त्रियांचे मत ऐकून घेण्यास देखील तयार नसणार्या या जगात विचार मांडण्यासाठी संघर्ष करणार्या स्त्रीची कथा आहे. यामध्ये एका नव्या उमेदीच्या तरुणाची कथा जो कॉर्पोरेट विश्वात प्रगती करत असताना आपले स्थान मिळवून कायम करण्यासाठी संघर्ष करत असतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.