सुधा मुर्तीं यांचे थ्री थाउजंड स्टीचेस् म्हणजे त्या इन्फोसिसच्या चेअरपर्सन असताना त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनुभवलेल्या ११ वेगवेगळ्या लघु कथांचे विवरण केले आहे. या पुस्तकामध्ये कर्नाटकातील ३००० देवदासींचे केलेले पुनर्वसनाचे चित्रण त्यांनी केले आहे. इंजिनियरींगचे शिक्षण घेत असताना सुधा मूर्ती या संपूर्ण मुलांच्या तुकडीमध्ये शिकत असलेल्या एकमेव मुलगी होत्या. त्यांनी या पुस्तकामध्ये आपल्या शैक्षणिक आयुष्यातील काही अनुभव लिहिलेले आहेत. सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यात आणि जगाच्या प्रवासात भेटलेल्या काही सिनेकलाकारांबद्दल देखील या पुस्तकात रोचक वर्णन केले आहे. हे पुस्तक म्हणजे खुसखुशीत लघुकथांची मेजवानीच आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.