द मॅजिक ऑफ लॉस्ट टेंपल हे पुस्तक ह्रदयस्पर्शी , सुंदर आणि रमणीय पुस्तक आहे. हि कथा एका लहान मुलीची आहे. ती आपल्या आज्जीआजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गावी आलेली आहे.गावाचे आणि शहराचे वेळापत्रक किती वेगवेगळे असते हे पाहुन ती जरा चकीतच होते. गावाच्या आरामशीर दैनंदिन जीवनाची ती सवय करुन घेते. ती स्वतःला वेगवेगळ्या कामांमध्ये म्हणजेच पापड वाळवणे, छोट्या सहली काढणे , सायकल चालवायला शिकणे यात गुंतवुन घेते. तिथे तिचे अनेक नवे मित्र मैत्रिणीं होतात. या कथेला खरी कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा तिला एका जंगलामध्ये प्राचीन पुराण कथांमधील विहिर सापडते आणि कथानक अधिकच रंजक होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.