नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, संवर्धन आणि उपयोग हे मनुष्याच्या आयुष्याच्या समृद्धीचं महत्वाचं रहस्य आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा धडा घालून दिला आणि जोपासण्यासाठी प्रेरणा दिली.हा पाठ समजून घेण्यासाठी बुकस्ट्रक वरील हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कार्व्हर यांचा जन्म अंदाजे १८६० चा असावा आणि लहानपणापासूनच झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतले होते.गुलामगिरीच्या सावटातुन यशाची पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी असलेलं नात कायम घट्ट राहिले होते. अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला जणूकाही देणगीच दिली. या सगळ्याचा या पुस्तका मध्ये आढावा आहे.