लेखातला हा अध्याय काही काल्पनिक घटना , कल्पना किंवा वादग्रस्त विधानांनी भरलेला असु शकतो. कार्व्हर नेहमी उच्च आवाजात बोलात असे. इतिहासकार लिंडा ओ. मॅकमुरी यांनी नमूद केले की ते (कार्व्हर) "एक दुर्बल आणि आजारी मुल होते" ज्याला डांग्या खोकल्याच्या गंभीर घटनेने आणि घशाच्या आजाराने ग्रासलेले होते.
मॅकमेरि यांनी कार्व्हरच्या घशाच्या त्रासाबद्दल असे निदान केले होते की, " लहान वयातील कार्व्हरची खुंटलेली वाढ आणि उच्च आवाज हे त्याला झालेल्या निमोनियाचे दुष्परिणाम आहेत. त्यांच्या संपुर्ण जीवनात जे कोणी त्यांना भेटले त्यांना हा विचित्र उच्च आवाज आठवणीत रहात होता. आयुष्यभर त्यांना घशाचा आणि छातीचा त्रास झाला." ज्या काळात कार्व्हर जगले लहानाचे मोठे झाले त्याकाळात कृष्णवर्णीयांवर अत्याचार होत असे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अशी अफवा होती की कार्व्हर यांचे लहानपणीच टाक्याच्या नसबंदीचे शिकार झाले होते. हे त्याच्या श्वेतवर्णीय मालकाने कार्व्हर अवधा अकरा वर्षाचा असताना करुन घेतले होते.म्हणुन त्यांची शारिरिक वाढ खुंटली होती. तसेच त्यांना आयुष्यभर दाढी ही आली नव्हती.त्यांच्या एका चरित्रात लिहले आहे कि त्यांना त्यांच्या शारीरिक जागांवर नुसतेच व्रण आहेत जे त्यांच्या लहानपणी घडलेल्या या घाटनांची पूर्तता करतात.