(शीतलच्या मृत्यूनंतर प्रगती व अनिकेत यांची पुन्हा भेट होते.)

प्रगती:- शीतल वाचू शकली असती.

अनिकेत:- तिचे आई-वडील इतके निष्काळजीपणे कसे काय वागू शकतात..?

प्रगती:- विश्वासच बसत नाहीये जे घडलयं त्यावर. 

अनिकेत:- खूपच वाईट झालं पण.... 

प्रगती:- (रडत रडत) आणि खूप प्रेमळ मैत्रीण होती रे माझी ती.... 

अनिकेत:- अगं रडू नकोस....प्लीज... 

प्रगती:- असच चालत राहिल तर काय होईल रे आपलं? 

अनिकेत:- हे बघं सध्या नको ते विचार मनात आणू नकोस.

प्रगती:- मला सध्यातरी आपलं भविष्य पूर्ण अंधारातच दिसतयं.

अनिकेत:- असं नाही होणार. मी वचन देतो. 

प्रगती:- थँक्स. तू सोबत आहेस म्हणून मी जरा निश्चिंत राहू शकते. 

अनिकेत:- आपण लवकरच या जगातून बाहेर पडू. 

प्रगती:- हो नक्कीच.
(दोघे एकमेकांच्या दिलाशावर जरा निश्चिंत होतात आणि नंतर शाळेला निघून जातात)
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel