(अंजली पळून गेल्याचे भयंकर पडसाद प्रगतीच्या आयुष्यावर उमटायला सुरू होतात. एकही व्यक्ती तिला घालून-पाडून बोलायचं सोडत नसते. खूप विचार करून प्रगती देखील गाव सोडण्याचा निर्णय घेते. आणि हा विचार ती अनिकेत समोर मांडते.)
प्रगती:- मला वाटतं हीच योग्य वेळ आहे.
अनिकेत:- कशाची? मला नीट सांग जरा प्रगती....
प्रगती:- आपण गाव सोडून जाऊ या ना अनिकेत.
अनिकेत:-अगं एका घटनेचे पडसाद पाहिलेस ना तू तरी...
प्रगती:- पाहिलेत म्हणूनच म्हणतीये....
अनिकेत:- तुझा निर्णय नक्की ठाम झालयं का?
प्रगती:- हो. माझा निर्णय पूर्णपणे झाला आहे.
अनिकेत:- ठीक आहे सोबत गाव सोडूयात.
प्रगती:- माझ्याजवळ आपल्याला एक महिना पुरतील एवढे पैसे आहेत.
अनिकेत:- माझ्या जवळही आहेत. आपण नव्याने आयुष्य सुरू करू.
प्रगती:- हो. जे केवळ आपलं आणि आपल्याच आयुष्य असेल.
अनिकेत:- हो पण पुढची प्लॅनिंग करायला मला चार पाच दिवस वेळ दे. नंतर आपण निघू.
प्रगती:- हो. चालेल.
( हा प्रसंग इथेच संपतो.)