हृदयाचा थरकाप उडवणारी भय कथा
"ही कथा थोडी मोठी असेल पण सत्यकथा आहे आणि ग्रामीण भागातील असल्यामुळे शहरी मित्रांना समजावी यासाठी जास्त तपशीलाद्वारे स्पष्ट केली आहे...
माझ्या गावी म्हणजे माजगाव मध्ये साधार 4 ते 5 वर्षापुर्वी घडलेली ही एक सत्यकथा आहे..
मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की, उन्हाळ्यात गावी 12 तास लोडशेडीँग असते.. मग शेतांना पाणी पाजण्याचे काम लाईट असेल, तेव्हा म्हणजे कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री करावे लागते.. अगदी मीही काहीवेळा पूर्ण रात्र जागलोय.. अशाच एका अमावस्येच्या रात्री आमच्या शेजारिल पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत उसाच्या शेतास पाणी पाजण्यास गेले..
काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरीँना समान पाणी सोडले.. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता.. मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते दोघेही झोपले.. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो त्यांचा खास मित्र होता तोच चेहरा तोच आवाज तिच शरिरयष्टी तो काकांना जागे करत होता..
काका उठल्यावर म्हणाला, 'पाटला, झोपलायस काही काम नाही का?'.. काका म्हणाले, 'अरे सर्व सरीँना पाणी सोडलेय.. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ.. पण तु इथे काय करतोयस?'.. तो, 'अरे तुझ्याकडेच आलोय.. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते.. दिवसा डोँगरात फॉरेस्ट(वनरक्षक) असतो.. चल आता घेऊन येऊया.. तुलाही आता तसे काही काम नाही आता'.. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, 'चल ठीक आहे, जाऊया'..
(मित्रांनो अशावेळी मनुष्य कसलीही शहानिशा विचार करत नाही कदाचित त्या वाईट शक्तीँचा प्रभाव पडत असावा)
काकांनी बॅटरी टॉवेल घेतला.. दोघेही निघाले गप्पा मारत ते कधी डोँगरात पोहोचले.. काकांनाही समजले नाही.. काका त्याला बोलले, 'बर चल तोड आता तुला हवे ते लाकुड'.. तो म्हणाला, 'जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत'.. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला..
आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किँवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते.. त्यांना दरदरून घाम फुटला होता.. अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले, 'कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?'.. आता तो मित्रही थांबला.. पण आता त्याचा आवाज बदलला होता.. आता तो काकांचा मित्र नव्हता.. त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचे होते.. पण काका शुद्धीवर आले होते.. तो काकांना म्हणाला, 'वाचलास तू'.. आणी क्षणार्धात गायब झाला.. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले..
सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडितून घरी आणावे लागले.. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते..
आता ते ठिक झाले आहेत त्यांनी शेतात ठीबक बसवले आहे.. ते आता रात्री शेतात जात नाहीत.. तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात..
मित्रांनो तुम्हाला पटो किँवा न पटो पण ही सत्यकथा आहे काकांची ती हालत त्यांचे भय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीले आहे अनुभवले आहे.."