स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक व्यक्तीमत्व नसून एक मार्गदर्शक विचार असेच म्हणता येईल.
२६ फेब्रुवारी १९६६ सकाळी १०.३०वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपला देह ठेवला. १फेब्रुवारी १९६६ पासूनच अन्न आणि औषध वर्ज्य करुन प्रायोपवेशनास त्यांनी प्रारंभ केला होता .मग या मधल्या काळात एक व्यक्ती म्हणून एक त्रिकालदर्शी दृष्टे म्हणून त्यांनी ठेवलेली मार्गदर्शक तत्वे आजच्या एकविसाव्या शतकात खरचं उपयोगी आहेत का?असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे उत्तर हो असेच देता येईल.
सावरकर बहुमुखु व्यक्तीमत्वाचे होते. हिंसा-अहिंसा स्वातंत्र्य , क्रांती, विज्ञान, यंत्र , भाषाशुद्धी, सुधारणा , कारागृह इत्यादी विविध विषयावर त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेतच.
पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आवडलेला भाग म्हणजे त्यांचा बुद्धिवाद जो वाखाण्यासारखा होता. बुद्धिवाद बुद्धी च्या आधाराने घेतलेले निर्णय ..मग आपणही आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक निर्णय घेतो ते सगळेच आपापल्या परीने बुद्धीवादीच असतात पण प्रत्येकाची गणना बुद्धीवादी म्हणून होत नाही. दैनंदिन गोष्टी चा बुद्धी शी संबध लावणारे सावरकर मात्र बुद्धीवादीच होते.
त्यांची काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर" विज्ञान हाच आधुनिक धर्म आहे" असे ते मानत कारण आजच्या जगण्यासाठी त्यांनी धर्म परंपरेचा आधार कधीच घेतला नाही.फ्रेंच राज्यक्रांतीनंतर युरोपने बुद्धीवादाची कास धरली म्हणून दोन हजार वर्षे पुढे तो गेला ही अशीच कास आपण धरावी असा त्यांचा प्रयत्न होता.पण म्हणून त्यांनी आपली जीवनमूल्ये सोडली नाहीत पण आजच्या काळात बुद्धीवादच कसा श्रेष्ठ हे पटवून दिले.ते बुद्धीवादी समाजसुधारकृ होते केवळ बुद्धी तर्क अनुभव इतिहास या आधारावर उपदेश करणारे सावरकर आपल्या बुद्धीवादाचे वैशिष्ट्य दाखवतात.न्याय अधिकारासाठी त्यांनी लढा दिला तो ही बुद्धीवादी दृष्टिकोनावरच त्यांची हिंदुतत्वनिष्ठा हा त्याचाच एक भाग सांगता येईल ही बाब आपल्या श्रद्धेचा भाग असावा ते बुद्धीवादावरच असावे असे ते मानत .
ते बुद्धीवादी होते याचे अजून वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर ते म्हणत सद्गुण आणि दुर्गुण त्या त्या परिस्थितीवर ठरतात. जो अनुकुल तो सद्गुण जो प्रतिकुल तो दुर्गुण.. जो लोकहितास उपयोगी मर्यादा दाखवणारा तो सद्गुण पण जेथून तो मानवी हितास घातक ठरतो घातास कारणीभूत ठरतो तो सदगुणही दुर्गुणात परावर्तित होतो. देशहिताला घातक ठरतील अशा सद्गुणप्रवृतीपासून लांब राहणेच योग्य असा सल्ला ही ते देत हे बुद्धीवादी सावरकरांचे वैशिष्ट्यच.
त्यांचा बुद्धीवाद निःपक्षपाती होता असेही म्हणता येईल.तो सर्वांसाठी समानच असावा हा विचार याचे द्योतक. सर्वसमावेशकता राज्यघटनेतही असावी ती बुद्धीवादावर आधारलेली असावी असा आग्रह ही त्यांनी धरला होता.
अशा अनेक गोष्टीतून सावरकर बुद्धीवादाचे पुरस्करते होते हे जाणवते.या बुद्धीवादामुळेच अंधश्रद्धा जातीयवाद यावर त्यांनी कडाडून टीका केली .स्वातंत्र्य , स्वराज्य , सुराज्य यासाठी आविरत अखंड परिश्रम करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तरुणांचे खरे प्रेरणास्थान ठरावेत.ते आहेत.आपल्या ६३वर्षांच्या कालखंडात त्यांनी दिलेली ही मार्गदर्शक तत्वे खरचं बहूमूल्य ठरावीत आज अशा आदर्शवादी विभूतिंचे स्मरण प्रेरणा मिळणे गरजेचे ...!?
सावरकरांचा हा बुद्धीवाद मला भावलेला पैलू ..सहजच आज २६फेबुवारी पुण्यस्मरण म्हणून मनात आलेला मांडण्याचा केवळ प्रयत्न ....!!
©मधुरा धायगुडे