मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन.बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंर्तमन ९० टक्के पॉवरफुल असते.

बाह्यमनाने अंर्तमनाला दिलेली सुचना किवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी अंर्तमन प्रयत्नांची  पराकाष्ठा करते. व जगातील सर्व प्राण्यांची अंर्तमन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात*. म्हणून "या हृदयीचे त्या हृदयी" असे म्हणतात . थोड अधिक विस्ताराने समजून  घेण्यासाठी बाह्यमनाला आपण तात्पुरते राम म्हणूया व अंर्तमनाला  हनुमान. रामाने हनुमानाला जे सांगितले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हनुमान पूर्णतः ताकद वापरतो.व आपल्या सगळ्यांचे हनुमान म्हणजेच (अंर्तमन) एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून संपूर्ण विश्वात हनुमान – वानरसेना गुगल नेटवर्क आहे.

जो विचार तुम्ही अंर्तमनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. याला ( LAW OF ATTRACTION) आकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात*.
भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल.जसे  भगवान बुद्ध म्हणतात "जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल".

आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो. सगळ्या प्रकारची तरंग वातावरणात आहेत.उदाहरणार्थ  जसे  आपण ज्या चॅनलचे बटन दाबतो तोच ट्यूनअप  होऊन प्रक्षेपित होतो. रेडिओची सुई जेथे मॅच होईल तीच धुन चालू होते. म्हणून आपण जो अँटेना  लावतो त्याच प्रकारची तरंग आपण आपल्याकडे  आकर्षित करत असतो.

जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती, संधी आकर्षित  कराल. शब्द व विचार हे जग आहे. म्हणून सकारात्मक विचार  करा.एकाच वेळेला अनेक जणांनी प्रार्थना केल्यावर भले ते दूर असोत  "क्वांटम फिजिक्स " (quantum physics) सिद्धांतानुसार ती फलदायी होते.

म्हणतातच कि  "किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुड जाती है" I म्हणून निर्भय होऊन कोरोना व्हायरस पंचतत्वात विलीन होऊन नष्ट झाला आहे. आपण सर्व  सुखी , निरोगी, आनंदी आहोत. सारे प्राणी सुखी  आहेत. सर्वांच कल्याण होत आहे. अशी प्रार्थना वारंवार करुया. डोळे बंद करून सर्व जग सुखी आहे. तुम्ही व तुमचे कुटुंब आनंदी व सुखी आहे असे भावना सहित चलचित्र (Visualisation) पुन्हा पुन्हा बघा.  सर्वांना संकटमुक्त केल्याबद्दल त्या वैश्विक शक्तीचे वारंवार आभार मानूयात .ही  "कृतज्ञतेची " साधना ....

संकटातून बाहेर पडण्याच्या आज हा उत्तम मार्ग आहे. कोरोना सारखा विषाणू सामान्य माणसाला हादरवून टाकतोय तेव्हा कोरोनाला आकर्षित करु नका...पण हा
क .क....करोना!!  खरचं का आला? ...कसा आला ...यावर आपापले चिंतन ,अभ्यास ,भाकित, परामर्श होत राहणारच ..बघा एवढी आकर्षण शक्ती च पण मग ती का तयार झाली या करोनाबाबत .,.हाच तर नियम जो जसा विचार होईल तशीच स्पदंने नैसर्गिक उर्जेला बाधित करणार हे केवळ एकाच वेळी अनेकांच्या मनात निर्माण झालेली नकारात्मकता च....आपल्या हातात एवढेच कि ती आपल्यापर्यत कशी पोहचणार नाही.,.सशक्त मनाच्या दरवाजावर तो टकटक करुन जाईलही तर कुणावर हावी होईल ...पण न घाबरणे हाच यावर उपाय ...अन् अध्यात्मही  विज्ञानाच्या हातात हात घालून थोडेसे पुढे जातेच हा नियम  मनात ठेवून दोन्ही चा आधार घेत क...करोनाला च घाबरायला लावता येईल अर्थात हा ज्याचा त्याचा विचार...व्यक्ती सापेक्षता ..!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel