नकारात्मक बाजू सकारात्मकतेने बघूयात हा विचार नकळत रुजवूयात हा प्रयत्न ...

रोजच्या सारखी सकाळी झाडांना पाणी घालायला म्हणून बाल्कनीत गेले अगदी रोज नियमाने माझा हा शिरस्ता पाणी घालता घालता रोज त्या झाडांशी  मनात काहीतरी कुजबुज करायची माझी सवय ,...बघता बघता ती अबोली राणी, तो चाफा, शेवंती मोगरा तुळस तर असतेच केवढी मोठी झाली ती झाडे ...सजीवांसारखेच मन भावना असणारच ना त्यांना मग थोडं बोलले तर बरे वाटत असेल ना असा उगाचच विचार आला ...

गच्ची,  बाल्कनी सध्याच्या या flat  संस्कृती तील मोकळी जागा

पंचमहाभूतामधील ते विस्तीर्ण मोकळं आकाश ,ढगांचा तो पाठशिवणीचा खेळ , न चुकता उगवणारा तो सूर्यनारायण न्.अगदी मावळतीचा सूर्य बघताना दिसणारे ते लालिमा ल्यालेलं आकाश, त्याला निरोप देणारा पश्चिमेचा सुटणारा गार सांजवारा असे छान मनोहर दृश्य त्याचे वर्णन करताना उपमा ही कमी पडतील ...अशी  बाल्कनी पण त्याचा आनंद घेताना तो किती घेवू किती नको असे होत ..हा झाला एक सकारात्मक विचार ...!!

बाल्कनीचा वापर करताना मिळलेली थोडी जादा जागा जिथे नको असलेल्या काही घरातील वस्तू ठेवणे कपडे वाळत घालणे किंवा मस्त वारा मिळावा मोकळ्या गप्पा मारण्याचे ठिकाण वा  इतर  अनेक गोष्टी होतात त्याची गरज असेल ही पण त्या करताना समोरच्या च्यां दिनचर्येची  सतत नोंद ठेवणं ,त्यानुसार आपला दिनक्रम  ठरवून त्यांच्या सुख दुःखावर  गप्पांवर सतत लक्ष ठेवत आपलं   जगणं त्यांच्या त बघत बाल्कनीचा गैरवापर करत असतील तर हा नकारात्मक वापर टाळायला हवा ...!!
*सगळ्यांच्या भावनेचा आदर आहेच तरीही.**

संपर्क संवादाचे पूल बांधणारी अशी  बाल्कनी ची छोटीशी जागा  पण आपला वेळ जाण्यासाठी बाल्कनीचा वापर करताना मग ती कोणत्याही "वयोगटातील व्यक्ती" असू देत एखाद्यावर सतत लक्ष देताना आपण कुणाला धोका तर पोहचवत नाही ना ...हा विचार ही   बाल्कनीत येता जाता करायला हवाच ....आपलं जगणं समोरच्या त बघताना...   !!!

स्वातंत्र्य आहेच हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी अशा मानसिकतेचा ही विचार व्हायला हवाच ..म्हणून ही कल्पनेतील बाल्कनी तुम्हाला ही वाटेल  हे अगदी बरोबरच आहे .....मग वाचताना  किंचीत खुद्कन  हसू येईलच अरे काय लिहलेय पण असा ही विचार व्हायला हवाच ....!!

सगळं छान छान म्हणताना प्रत्येक वस्तू गोष्टींची दुसरी बाजूच जास्त महत्वाची ती प्रथम बघायला हवी तर पहिली बाजू उत्तमता देईल असा विचार ....!

काहीशा नकारात्मक अनुभवाचा विचार करताना या गोष्टी लक्षात आल्या कारण कोणत्याही गोष्टी ची ही वहिवाट पडत असेल तर ती  सवय वाईटच घातक च...!!

वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात त्याचा विचार केला तर ...आयुष्यातील बराचसा वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळविण्यासाठी होईल कि.....!!

थोडे नकारात्मक बाल्कनी या जागेच्या वापरा विषयी लिहावेसे वाटले  ....नकारात्मक लिहताना  नकळत काय करु नये बाल्कनीचा वापर करताना हा सकारात्मक विचार काही बदल घडवू शकतात ...पटले असेलच .....!!

आता तुम्ही म्हणाल हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग ....पण तरी ही आपण ही दुसरी बाजू इतरांना सापेक्ष  ठेवून बघितली तर काय हरकत आहे ना. .व्यक्ती स्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , लोकशाही , ज्याच्या त्याच्या मताचा विचार हे कितीही खरे असले तरी ...चुकणाराल्या  वाट नक्कीच दिसेल ही त्यात  तुम्ही वा मी कुणीही असेल ....व्यक्ती सापेक्षता आहेच म्हणताना वास्तूतील त्या छोट्या बाल्कनीचे ही आभार मानते नकळत तिची ही काही बाजू  मन असेल तिला ही आपली अशी थोडी स्पेस .. हा विचारच रुजवण्याचा प्रयत्न ...!!!

आपापल्या विश्वात जरुर राहवं पण ते इतरांनाआपल्या बाल्कनीतील वावराचा   डोईजडपणा त्रास होणार नाही याची मर्यादा ही बघायला हवीच.....!!

मोकळे आकाश बघता बघता मन ही तसचं असावं हे  खरे असले तरी त्यातील इतर  संभाव्यता पाहणे ही गरजेचेच असा विचार हा नकारात्मक प्रभाव घालवू शकेल  .....!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel