आनंद, मांगल्य ,पावित्र्य, उत्तमता या चार बिंदूवर थांबलेले मानवी आयुष्य नवी चेतना घेवून उमलते ते त्या त्या वेळच्या क्षणांनी ...क्षण ही एक मोलाची पर्वणीच ठरते आठवणींनी मोहरुन नवी उमेद देणारा तो क्षण .......

 सुख व दुःख या दोन बिंदूमधून जाणारा क्षण सुखात आनंद तर दुःखाच्या क्षणी अनुभवाने समृद्ध करुन जातो फक्त ते क्ष ण वेचण्याचे कसब महत्वाचे ठरते ...क्षणात क्षणासाठी क्षणभर वेचता येणारे.......!

आयुष्यात प्रथम घडणाऱ्या त्या त्या गोष्टी त्या त्या क्षणी सुखावून जातात आईने आपल्या बाळाला प्रथम चालताना बघण्याचा तो क्षण ...पहिल्या नोकरीचा पहिला पगार घेताना चा तो क्षण ...असे बरेच क्षण .....या क्षणांच्या रेषाखंडावर तर आपल्या जगण्याची समरुपता ठरत असते फक्त त्या त्या क्षणात जगता यायला हवेच...निसटून गेलेले ते क्षण परत मात्र येत नाहीत अन्  मग त्यावेळी त्या क्षणांना आपण न्याय देवू शकलो नाही तर मात्र दुःखाचा तो क्षण खंत म्हणून जगावा लागतो ...त्या त्या वयातील क्षण जगण्याचा अनुभव मिळायला हवा ..घरातून त्या त्यावेळी  आपुलकी माया कौतुक प्रोत्साहन  मिळणारे ते क्षण आयुष्य सकारात्मक करतात ....!

काळ्याक्षार पाटीवर मीच कोरलेला तो "श्री "आज ही तो क्षण आठवतो मग नंतर ही मुळाक्षरे  नकळत माझी आपलशी कधी झाली नंतर प्रत्येक टप्प्यावर साथ देत राहिली ....कळलेच नाही तो क्षण मी तेव्हा जगले नसते तर आजचा हा क्षण साजरा करु शकले नसते ...

प्रत्येक क्षणांची ती ती वेळ असते हे समजणेच हरवत चाललेय..का?.."खा प्या मजा करा  "फेका- फेकी"मला काय करायचेय "आम्ही" "आपले "ऐवजी मी  माझे आमची आमचेत अडकलेल्या  संस्कृती ने  या छोट्या गोष्टी तील त्या क्षणांची मजा ...... . मोबाईल संगणक च्या या काळात बालपणीचा रम्य क्षणांचा काळ ही धुसर होत चाललाय भावनाशून्यता म्हणजे तो क्षण असेच गणित....सगळेच सहज उपलब्ध यामुळे नवीन नव्याची नवलाई अनुभवण्याचे ते क्षण कुठे गेलेत असा विचार आला.....

स्पर्श ,इच्छा ,मोह या विकाराच्या अधिक्याने  कोवळ्या भावना दर्शवणा-या क्षणांना विसरत चाललो आहोत ....हा काय करतो ? तो काय करतो? याचे काय तो असा ?? अशा निष्फळ उठाठेवी करत आपल्या पुढ्यात पडलेले ते क्षण स्वतः त्या व्यक्ती शी संवाद न साधता त्याच्या आयुष्यात आपण जगत असतो  ते क्षण निर्जीवता आणतात ...तर स्वतः चा आनंद हिरावतात...आपण कसे आहोत हे इतर ठरवतात तेव्हा मात्र तो आनंदाचा क्षण ..त्यांना सुखावणारा ठरतो हे खरे ....!!

पेरल्याशिवाय उगवत नाही ....जे पेराल तेच उगवेल हा निसर्ग नियमच  म्हणून च जगत राहावेत हे क्षण आपल्या कसोटीच्या काळातही जगण्याचे बळ आठवणी च्यारुपात समोर येवून पुन्हा एकदा वर्तमानाला  आनंदाने व्यापून टाकणारे .....भूतकाळ विसरता येता नाही त्यावर तुमचा  वर्तमान भविष्यकाळ ठरतो ...भूतकाळ चांगला होण्यासाठी वर्तमानातील हे क्षण वेचता आले तर क्षणभर  आनंदाने सुखावून टाकणारे सुखी क्षण ....!!!

जगताना आपल्या मुळे कुणी दुःखी तर होत नाही ना हा क्षणभर विचार ही हवाच गेलेले क्षण परत येत नाहीत ...मानवी आयुष्य ही नश्वर वेळ आपल्या हातात नाही पण....ते ते क्षण त्या त्यावेळी जगणं हेच आयुष्य ....!!!

असे हे क्षण सध्याच्या या कसोटीच्या काळात आनंदाने वेचून मोत्यासारखे विखुरता यायला हवे ...शीतलता देणारे समृद्ध क्षण ....!!

कारण

"कालचे  ते आज नाही
आजचे नाही उद्या
क्षण आले आज हाती लावणे सार्थकाला  .....!!"

व्यक्ती सापेक्षता आहेच

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel