"सर्वभूति तो सर्वेश्वर" चैतन्यरूपाने परमेश्वराचा वास साऱ्या विश्वात विश्वाच्या प्राणिमात्रात भरून उरला आहे. डोळे आहेत पण "पाहण्याची शक्ती तो ", कान आहेत पण "ऐकण्याची शक्ती तो "परमेश्वर आणि हेच शरीराचे खरे चैतन्य, हे चैतन्य निघून गेल्यावर नुसते शरीर म्हणजे मतिमय शरीरात वास करणाऱ्या प्राणवायूमुळे मानवी जीवन फुलत जाते माणसात प्राण आहे म्हणून तो अस्तित्व टिकून आहे. या प्राणांची उपासना करणे म्हणजे आपले जीवन फुलवणे त्यामुळे मानवाच्या व्यक्तिजीवनाला कुटुंबाजीवनाला समाजजीवनाला अगदी राष्ट्रीय जीवनाला देखील प्राणवान अर्थपूर्ण बनवता येते. कारण निष्प्राण मानव कोणतेच कार्य सकारात्मक करू शकत नाहीत नव्हे पृथ्वीवर केवळ भार असेच त्यांचे अस्तित्व राहते म्हणून शरीरातील या पंचप्राणांची उपासना महत्वाची त्याचे महत्व ...

फार पूर्वीपासून आपल्या ऋषिमुनींनी सांगितले आहे. शरीरात वास करणारा "एकच प्राण "वेगवेगळ्या ठिकाणी राहून वेगळे कार्य करतो. "हृदयात तो प्राणवायू "च्या रुपात आहे त्यामुळे मानवी जीवन टिकून राहते.
आपल्या "कंठात तो उदान वायुरूपात राहतो" म्हणून "स्वर" जो कंठातून बाहेर पडतो शब्दांच्या उच्चारांच्या  रुपात तो नाशवंत नसतो प्रत्येक स्वर या हवेमध्ये विरून जातो आणि ठराविक काळानंतर पुन्हा त्याच स्वरांचे पुनर्जीवन पुनउच्चारांत होते असे म्हणतात म्हणूनच आपल्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक "स्वर" 'सकारात्मक 'चांगला हवा असेल तर संपूर्ण शरीरात तो प्राणवायू "व्यान" रुपात फिरत राहतो.

हृदयात वास करणारा प्राणवायू रक्तशुद्धी करतो त्यामुळे आपल्यात स्फूर्ती, चैतन्य, उत्साह टिकून राहतो प्राणाची उपासना म्हणजे खरतर प्राणवान विचारांची उपासना एखाद्या बद्दल निषेध व्यक्त करणारे विचार मानवी जीवनाचा ऱ्हास करतात नकळत माणूस निराशावादी नास्तिक बनत जातो उलट चांगले संभाषण विचार त्याच्यात आशेचा संचार करून निराश होवू देत नाही तर जीवनात दुसरी बाजू बघण्याची दृष्टी तो स्वतःहून विकसित करते आणि अशा उत्साही विचारी माणसाच्या घरात लक्ष्मी स्वतःहून धावत येईल असा विचार देखील उत्तम प्राणशक्ती निर्माण करेल का ?

स्वामी विवेकानंदांनी अशा निष्ठावान प्राणशक्ती असलेल्या प्रलोभनांना बळी न पडणाऱ्या मानवांची विश्वपरिवर्तन करण्यासाठी मागणी केली होती. आपल्या कुटुंबातूनही प्राणांची उपासना निघून गेली तर माणूस केवळ यंत्रवत बनेल नात्यांमध्ये कोरडेपणा व्यवहार येईल भावना प्रेम माया हे शब्द पुन्हा "उदान" वायुरूपाने हवेत विरून जाण्यापूरतेच उरतील अगदी आपल्या देशातूनही जर ही प्राणांची उपासना निघून गेली तर हे राष्ट्र गलितगात्र बनून शरणागत बनेल असे ही म्हणता येईल.

शरीरातून मळ किंवा कचरा बाहेर फेकला गेला नाही तर शरीर रोगग्रस्त बनते तसेच जीवनात निरुपयोगी ठरणाऱ्या गोष्टी क्षुद्र खोटे अहंकार लोभ मोह राग  यांचे विसर्जन केले तरी या प्राणवायूची उपासना केल्यासारखे होईल.

मानवी जीवन फुलत असताना कुटुंब, समाज, राष्ट्र, अगदी "परमेश्वरी चिंतन" ह्या प्रत्येक टप्प्यावर मन संकुचित असेल. एखाद्याकडे बघण्याची पूर्वग्रहदृष्टी नकारात्मक असेल तर जीवनाची ही पाऊलवाट चालताना अपेक्षित कार्यसिद्धीत अडथळे निर्माण होतील. मग मनाची प्रसन्नता मानसिक शांती टिकवण्यासाठी ह्या "अपान" प्राणवायूचे योग्यप्रकारे विसर्जन करता येणे हे दोन्हींबाजूने आवश्यक ठरेल.

आपले शरीर वात, कफ, पित्त या तीन प्रकृतीने बनले आहे त्याचा समन्वय राहणे शरीरासाठी महत्वाचे त्यासाठी जीवनाचा समतोल साधता येणे गरजेचे. "स्वीकृती ,आनंद, वास्तव, चांगुलपणा, ह्याची गोळाबेरीज म्हणजे आयुष्य असे मानले तर यश-अपयश, सुख-दुःख, लाभ-हानी ह्यात समवृत्ती ठेवणे महत्वाचे ठरते "

कारण अपयश म्हणजे यशाचा विरोध नाही तर यशाचा विलंब सुचविते असे मानले  तर अपयश आणि त्यामुळे मिळणारे दुःख, होणारी हानी यामध्ये समतोल राखता येईल कारण यश अपयश म्हणजे मानवी जीवन नव्हे तर त्यापेक्षा मानवाचा आत्मिक विकास होणे म्हणजे यश असेही म्हणता येईल आणि असा मानव कोणत्याही परिस्थितीत निष्प्राण न बनता स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवू शकतो.

जसे ढेकर आला की पोटाचा आणि शिंक अली की डोक्याचा भार हलका होतो तसेच एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या पुसलेल्या भावनांच्या व्यक्त करण्यामुळे आपल्या व त्याच्या संबंधातील भार हलका होईल एकमेकांबद्दलचे भाव व्यक्त करण्याचा संकुचित वृत्तीमुळे संबंधात कटुता द्वेष निर्माण होतो त्यामुळे "सहकार्य, "प्रोत्साहन" "स्तुती" ह्या भावनादेखील नकारात्मक विचाराने दबल्या जावून प्राणहानीच होते कारण आपल्या वाणीतून मुखातून भाव व्यक्त करण्याची देणगी फक्त मानवाला या परमेश्वराने दिली आहे मग एखाद्याच्या चांगुलपणाला चांगले म्हणले तर कुठे बिघडले प्रशंसेची फुले उधळणे म्हणजे विष्णुसहस्त्रनामाची उपासना करण्याचे पुण्य मिळवणे असेही म्हणता येईल.

आपली भारतीय संस्कृती टिकून आहे अशाच प्राणवायूची विचारांमुळेच स्वतःचे पर्यायाने समाजाचे राष्ट्राचे अस्तित्व टिकवून ठेवतात हे आपले पंचप्राणयुक्त शरीर मग अशा देहरूपी मंदिरातील पूजन म्हणजे या प्राणरूपी आत्म्याचे पूजन त्याचे स्मरण करत आयुष्यात मिळालेल्या या यशापयेशाचे  समर्पण त्या परमेश्वराला  करीत राहणे हीच ठेव खऱ्या  आत्मविकासाच, आत्मसुखाची करता करविता तो चालविता बोलविता धनी तो परमेश्वर ज्याचे अस्तित्व दाखवता येत नाही पण मानवाच्या पंचप्राणात त्याचा वास आहे असे मानले तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या तसेच या विश्वातील प्रत्येक मानवाप्रति आदर बाळगणे त्याला योग्य मानणे म्हणजे प्राणोपासना त्याच्या व आपल्या विचारांची उपासना आणि माणसातील माणूस ओळखणे हेच ईश्वरी अस्तित्व मानणे म्हणजे आपल्या हृदयातील या प्राणांची उपासना होय कारण "देह हे देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर" हे आपण जाणतोच त्या आत्म्याची उपासना म्हणजे प्राणोपासना जी मानवी अस्तित्व फुलवण्यासाठी सकारात्मकता हवी..........हा एक विचार........ प्राण आत्मा मानव हेच आत्मसुख, हीच पंचप्राण उपासना...!

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel