बॉस्टन मध्ये घडलेली हि घटना आहे.  हि खूनाची घटना करीना होमर या बॉस्टन मध्ये राहणाऱ्या महिलेची आहे. हि घटना १९९६ साली घडलेली आहे. करीना होमरचा भूतकाळ काहीसा मनोरंजक आहे. करीना होमरने स्वीडन मध्ये एक लोटरीचे तिकीट जिंकले होते. ते पैसे मिळाल्यावर तिने अमेरिकेत वर्षभरासाठी रहायचे ठरवले होते. उदरनिर्वाहासाठी तिने अमेरिकेतच एक नोकरी शोधली. तीने श्रीमत लोकांच्या घरात नोकरी करायचे ठरवले. त्यांचे घर बॉस्टन शहराबाहेर होते. त्या परिवाराने आपल्या घराच्या वरच्या मळ्याची किल्लीही तिला दिल होती. शिवाय ते तिला दर शनिवार रविवार सुट्टी देत. आशयाच एका शुक्रवारी आपले काम आटोपून ती आपल्या बॉस्टन शहरातल्या मित्र-मैत्रिणींबरोबर एका बर मध्ये गेली होती. त्यादिवशी जून महिन्याची २१ तारीख होती.  त्यादिवशी तिला झेपेल त्यापेक्षा  जरा जास्तच प्यायली होती. ते सगळेजण अनेक वेगवेगळ्या बारमध्ये  आपला विकेंड एन्जॉय करत होते. ते आता शेवटच्या बारमध्ये जात होते. त्या बारचे नाव “झांझिबार “ असे होते. त्या बार मध्ये इतकी गर्दी होती कि सगळेजण वेगळे झाले आणि ती आपल्या मित्र-मैत्रिणीपासून लांब गेली. थोड्यावेळाने तिला वाटले कि तिचे मित्र-मैत्रिणी तिला सोडून निघून गेले आहेत. ती इतकी नशेत धुंद होती कि तिला हेही जाणवले नाही कि ती सगळ्यांना सोडून क्लब मधून बाहेर पडली होती.  ती जिथे काम करत होती त्या घराकडे जाऊ लागली. 

जेव्हा तिची केस ओपन झाली तेंव्हा तिचा एक फोटो समोर आला. ह्यात ती एका बेघर आणि नशेडी माणसाबरोबर झांझिबार क्लबच्या बाहेर नाचत होती. ती ही तेव्हा मद्यधुंद अवस्थेत होती. तीन दिवसांनी म्हणजेच रविवारी २३ जूनला तिच्या शरीराचा वरचा भाग एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळाला. तो ढिगारा तिच्या कामाच्या जागेपासून तीन मैलांच्या अंतरावर होता. तिचे शव चेन-सॉने कापल्यासारखे वाटत होते. तिच्या शवाचा अर्धा भाग जवळपास सापडला नव्हता. या घटनेवर अनेक प्रश्न उठले. ह्या घटनेनंतर अनेक लोकांनी तिला शेवटच कुणी पहिला यावर वेगवेगळे दावे केले. त्यातून सत्य बाहेर आलेच नाही. काहींनी सांगितले कि ती एका गाडीतून तिचे शव तिथे मिळाले त्या जागेपर्यंत आली होती. पण अनेक जणांच्या डाव्यांमध्ये एकच फरक होता. प्रत्येकाने गाडीचे वर्णन वेगळे सांगितले होते यावरून पोलिसांनी असं अंदाज लावला कि प्रत्येकजण आपापली गोष्ट तयार करून सांगत आहेत. काही लोकांनी सांगितले कि एका बिल्डींगच्या छतावर उभी असलेली पहिली होती. त्यामुळे हा खून नेहमीसारखा नुसता गळा घोटून केलेला नसून काहीतरी वेगळ आहे हे पोलिसांनी जाणले होते. तिचे शव ज्याप्रमाणे कापले गेले होते त्यावरून एखाद्या खातीकाचे काम असावे असाही अंदाज तंव्हा पोलिसांनी लावला.  कारण ज्याप्रकारे तिच्या शवाचे तुकडे केले होते तसे केवळ एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करून मारताना करतात. ते वार इतके सराईतपणे केले होते कि कदाचित एखाद्या डॉक्टर किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्याने केले असतील असाही एक अंदाज बांधला गेला. तिच्या गळ्याभोवती गला घोटल्याचे निशाण दिसत होते. ते निशाण इतके  खोल दिसत नव्हते ज्यामुळे तिचा मृत्यू  ओढवला  असेल. हा खून सहज सहजी होण्यासारखा नव्हता. हे सगळे जुळवून येण्यासाठी बराच वेळ खुन्याने घेतला असेल.

खुन्याने इतका सगळं केवळ चांगल्या योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणलेलं होत. पोलिसांना जवळपास कुठेही काही पुरावा मिळाला नाही. तिच्या शवावर काही अस्पष्ट खुणा होत्या काही डाग होते. पोलिसांना मात्र या खुणा आणि डाग यांचे गूढ उकलत नव्हते. ह्या कशाच्या खुणा आहेत हे ही कळत नव्हते. ती मरणाच्या पूर्वी ज्या लोकांबरोबर बाहेर फिरायला आणि जेवायला गेली होती त्यांची यादी पोलिसांनी  काढली. त्या यादीत एका बॉस्टनच्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव हि होते. या सगळ्यातून पुढे काहीही निष्पन्न झाले नाही. काहीवेळा साठी पोलिसांना ती जिथे काम करत होती त्या घरातल्या लोकांवरही शंका आली. सगळे तर्क-वितर्क असल्याने हि केस आजपर्यंत कुणीही सोडवू शकले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel