फिलाडेल्फियामध्ये "खोक्यातला मुलगा" या नावाने फॉक्सचेस पोलिसांच्या केस फाईलमध्ये एक केस आहे. हि गोष्ट फेब्रुवारी २६,१९५७ ची आहे. या दिवशी स्थानिक पोलिसांना एका खाकी खोक्यात ४-६ वर्षीय मुलाचे प्रेत सापडले. पुढे तपासात असे दिसले की मुलाचा खुन करुन मग त्याला या खोक्यात टाकण्यात आले होते. खोक्यात टाकताना त्याला एका गोधडीत गुंडाळले होते. हा खोका पेन्स्लवेनिया मधील फिलाडेल्फिया शहरातील फॉक्स चेस या भागात सापडला होता खरतर ह्या मुलाच्या प्रेताला दोन जणांनी पाहिले होते आणि कदाचित हाताळले ही होते. पोलिसांच्या भितिपोटी त्यांनी हा गुन्हा नोंदवला नाही. पहिल्यांदा एका शिकार्‍याने टाकलेल्या सापळ्यात ह्या मुलाला पाहिले होता. नंतर त्या मुलाचे प्रेत तिथे सस्याच्या मागे आलेल्या एका कॉलेजमध्ये शिकणार्‍या मुलाला दिसले होते. परंतु त्या कॉलेजच्या मुलाने दुसर्‍या दिवशी पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी याला फार महत्व दिले नाही.लहान मुलाचे फोटो जेव्हा जगासमोर आले अाणि लोकांना कळले तेंव्हा पोलिसांनी पुढचा तपास चालु केला. काहि दिवसांपर्यंत कुणालाही या केस मध्ये अटक झाली नाही. पण या केसमध्ये लोकांनीच काही सिद्धांत मांडले. तो लहान मुलगा ज्या अनाथ आश्रमात राहायचा तो आश्राम त्याचे शव मिळालेलं त्या जागे पासून अगदी जवळ होता. म्हणजेच त्याचा मृत्यू अनाथाश्रमात झाला असण्याची शक्यता आहे. दुसरा सिद्धांत असं होता कि त्याच्या आई वडिलांनी पैश्यांसाठी त्याला कुणाला तरी विकले होते. त्याच्या पालकांनी ज्या घरात त्याला विकले होते तिथे त्याचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जाई. हि माहिती एका मुलीने पुढे आणली आणि तिने हेही सांगितले कि तिच्या आईने या लहान मुलाचे शारीरिक शोषण केलेलं आहे.

 पोलिसांनी अजून तपास केल्यावर त्यांच्या हे लक्षात आले कि त्या मुलीला वेदाचे झटके येत असत. पोलिसांनी असं तर्क बांधल एकी त्या मुलीने त्या लहान मुलाबरोबर काहीतरी बरे वाईट केले असावे.पण पुराव्यांअभावी आणि मनोरुग्न असल्यामुळे त्या मुलीला सोडावे लागले. हे सगळे घडत असताना मुलाच्या ओळखीचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला.कुठूनही मुलाची ओळख होऊ शकली नाही. त्याच्या केस मध्ये पोलिसांना काहीही हात लागले नाही. ह्या मुलाबद्दल पोलिसांनी जी माहिती मिळवली त्यानुसार हा मुलगा चार ते सहा वर्षाचा होता. त्याचे नग्न शरीर एका स्वस्तातल्या राजईमध्ये गुंडाळलेले होते. त्याचा चेरा वरच्या दिशेने ठेवण्यात आला होता जसे एखाद्याला शवपेटीत ठेवण्यात येते. त्यामुलाचे शव पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ होते. त्यामुलाचे हात काळजीपूर्वक दुमडून पोटाजवळ ठेवण्यात आले होते. त्यामुलाची पायाची आणि हाताची नखं नुकतीच कापली होती. त्याचे शव हे आत्ताच अंत्यसंस्कारासाठी तयार असलेल्या लहान मुलाचे शव होते.  कदाचित त्याचे आई-वडील इतके गरीब असतील कि आपल्या नुकत्याच मरण ओढवलेल्यामुलासाठी एक शवपेटी आणि राखीव जागा मिळवण्यासाठी पैसे नसतील.

मुलाच्या शरीरावर बऱ्याच जखमा होत्या. विशेषतः डोके आणि चेहऱ्यावर. सर्व जखमा एकाच वेळी झाल्या असाव्यात. शरीरावर सात चट्टे देखील होते, त्यापैकी तीन शस्त्रक्रियेमुळे झालेले असावेत असा अंदाज होता. यापैकी दोन "सर्जिकल" चट्टे छातीवर होते.मुलाच्या डाव्या घोट्यावर एक डागही होता, तो "कट-डाऊन"सारखा दिसत होता.अशी चीर नस उघडकीस आणण्यासाठी बनविली जाते जेणेकरून रक्त काढणे किंवा रक्तसंक्रमण करण्यासाठी सुई घातली जाऊ शकते. छातीच्या डाव्या बाजूला दीड इंचाचा डाग होता आणि डाव्या कोपरावर गोल, अनियमित डाग होती. हनुवटीवर एल-आकाराचे डाग होते - प्रत्येक दिशेने एक इंच लांबीचा. मुलाची सुंता झाली होती. चेहऱ्यावर डाव्या बाजूला तीन लहान मोल होते, उजव्या कानाच्या खाली एक लहान, छातीच्या उजवीकडे तीन लहान आणि उजव्या हाताला दोन इंच करंगळी पासून जरासे लांब एक डाग होता.  मुलाचे दात संपूर्णपणे शाबूत होते.  दात किंचित टोकदार होते. त्यामुलाचे  टॉन्सिल्स काढले नव्हते. त्याच्या उजव्या हाताचे तळवे आणि त्याच्या दोन्ही पायांचे तळवे सुरकुतलेले होते. ह्या परिस्थितीला पोलिसांनी “वॉशरवुमन” प्रभाव म्हटले आहे, हे दर्शवते की मृत्यूच्या अगदी आधी किंवा नंतर एक हात आणि दोन्ही पाय  बराच वेळ पाण्यात बुडवले गेले होते. जेव्हा मुलाच्या डाव्या डोळ्यावर अल्ट्राव्हायोलेटचा प्रकाश टाकण्यात आला  तेव्हा त्याने चमकदार निळ्या रंग उभारून आला. यामुळे असे सूचित केले की त्त्यामुलाला शक्यतो डोळ्याच्या तीव्र आजारावर उपचार करण्यासाठी एक विशेष निदान रंग लागू केला गेला होता.

मुलाच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या तपासणीतून असे दिसून आले की त्याने त्याच्या मृत्यूच्या आधी दोन किंवा तीन तास खाल्लेले नाही. मुलाच्या शरीरावर असलेल्या क्ष-किरणांनी सध्या किंवा पूर्वीच्या हाडांच्या अस्थिभंग झाल्याचा कोणताही पुरावा नाही. थंड हवामानामुळे तो मुलगा किती काळ मरण पावला हे सांगणे कठीण झाले. दोन किंवा तीन दिवस गेले असतील किंवा शक्यतो दोन किंवा तीन आठवडे असावेत. हि पण केस पोलिसांच्या केस  फाईलमध्येच अर्धवट अडकून पडली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel