बार्बरा आणि पॅट्रिशीया ग्रीम या बहिणींच्या खुनाची कहाणी जरा विचार करायला लावणारी आहे. बार्बरा पंधरा आणि पॅट्रीशीया तेरा वर्षाची होती. त्या ब्रीगटन पार्कच्या शेजारी रहात होत्या. तिथेच जवळ नव्याने उघडलेल्या चित्रपटगृहात लव मी टेंडर हा एलविस प्रेसलीचा चित्रपट लागला होता. २८ डिसेंबर १९५७ रोजी हा चित्रपट पाहायला गेलेल्या या बहिणी कधी परतल्याच नाहीत. त्यांची नग्न शवे एका महिन्याने म्हणजेच २७ जानेवारी १९५७ ला विलो स्प्रिंगस येथे सापडली. त्या रात्री खुप पाऊस आणि बर्फ होता.
जवळच एका ठीकाणी कंस्ट्रक्शनच काम चालु होतं तिथल्या कामगारांनी या मुलींची शवे पाहिली होती. त्यांची शवे जर्मन चर्च रोड जवळ काउंटी लाईन रोडला दिसली होती. त्यावेळी अनेक वेगवेगळे अनुमान लावले गेलेल होते. काहिंच म्हणणं होतं की त्यांना कुणीतरी जेवायला बाहेर नेले होता आणि त्यांच्या घरापर्यंत सोडलं होतं. यासाठी अनेक वेगवेगळे संशयित होते. अगदी शुन्य बौद्धिकता असलेल्या घरगड्यापासुन ते एलविस प्रेसली सारख्या सुंदर दिसणार्या त्यांच्याच वयाच्या मुलापर्यंत सगळे होते. त्यातल्या त्या मुलाला नंतर जेलमध्येही डांबण्यात आले होते . त्यामुलाने अपल्या जावाबात सांगितले होते की त्याच्या स्वप्नात त्या मुलिंचे शव आले होते. शिवाय त्याने सांगितलेल्या जागे पासुन काहि अंतरावर बार्बरा आणि पॅट्रिशिया यांचे शव सापडले होते म्हणुन पोलिसांनी त्याला कैदेत ठेवले होते.
त्यांची शवं नंतर पोस्टमॉर्टेमला नेली. कुक कंट्रीच्या मेडिकल एक्झामिनरने ग्रीम बहिणींबद्दलची काही तथ्य पोलिसांना सांगितली. त्याने सांगितले की ज्या दिवशी त्यांची शवं मिळाली त्याच दिवशी सकाळी किंवा आदल्या रात्रीच त्यांचा मृत्यु झाला आहे. परंतु बर्फात त्याची शवं राहिल्यामुळे त्यांच विघटन होण्यास सुरुवात नाही झाली. ते ठिकाण १९५७ साली बरेच ओसाड होते. आता त्याच ठिकाणी शिकागोतील सगळ्यात मोठे पाळीव प्राण्यांचे कबरिस्तान आहे. आता तुम्ही त्याठिकाणी उभे राहिलात तर तुमची नजर जाईल तिथपर्यंत फक्त काही घरं आणि भरपुर झाडं दिसतील.
शिकागो पोलिसांनी ह्या केसचा तपास १९५६ पासुन ते १९७३ पर्यंत केला. त्यांच्या हाती काही ठोस पुरावे मिळालेच नाहीत. त्यामुळे कुणालाही अटक केली नाही. त्या बहिणींना लोकांनी शेवटचे पाहिले होते ते सिनेमागृहाच्या पॉपकॉर्नच्या रांगेतच.