जगातील न उलगडलेल्या खुनांची यादी या खुनाच्या नावाशिवाय पुर्णच होणार नाही. जॅक द रिपर हि न उलगडलेल्या खुनांच्या इतिहासातील आजपर्यंतची सगळ्यात कुख्यात एकमेव केस आहे. हि घटना १८८८ सालची लंडनमधील व्हाईटचॅपल तालुक्यातील आहे. जॅक द रिपर हा मुख्यत्वे महिला वैश्यांना मारत असे. महिला वैश्यांचे गळे चिरलेले असत आणि त्यांच्या ओटीपोटाजवळ काहिसे बदल केलेले दिसुन येत होते. असा एक अंदाज लावला गेला होता की, जॅक द रिपरला माणसाची शरिर रचने फारच चांगली माहिती होती. कदाचित खुनी खाटिक किंवा डॉक्टर असावा. हा अंदाज यामुळे लावला गेला कारण त्याच्या  या अमानुशतेला बळी गेलेल्यांचे विशिष्ट अवयवच गायब झाले होते.  या घटनेचे पाच बळी खुपच सुप्रसिद्ध होते. मेरी एॅन निकोलस् , ऍनी चॅपमन, एलिझाबेथ स्ट्राईड, कॅथरिन एडॉस् आणि मेरी जेन केली या वेैश्या जॅक द रिपरच्या केसमधील सुप्रसिद्ध बळी ठरल्या. काही काळानंतर व्हाईटचॅपल परिसरात अनेक खुन झाले जे जॅक द रिपरने केले असण्याची शक्यता वर्तवली गेली. परंतु ते खुन या पाच खुनांपेक्षा फारच वेगळे होते. पुढील काही वर्षात जॅक सारखे अनेक खुन झाले पण पुराव्या अभावी कुणालाही पकडता आले नाही. पोलिसांच्या रडारवर नेहमीच डॉक्टर, खाटिक, कत्तलखान्यात काम करणारे कामगार हे होते. परंतु त्यातुन काहीच साध्य झाले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel