न्यु ऑर्लिन्सचा एक्समॅन हा सिरियल किलर होता. तो न्यु ऑर्लिन्स, लुईझीयाना येथे मे १९१८ ते ऑक्टोबर १९१९ पर्यंत कार्यरत होता. एक्समॅन हा आपल्या कुर्हाडीच्या घावाने लोकांना मारत असे. काही प्रकरणामध्ये तो त्याच कुर्हाडीने घराचे दरवाजे तोडुन आत शिरत असल्याचेही दावे केले गेले आहेत. त्याची शिकार हे सहज सापडणार्या व्यक्ती होते. तो इतर खुन्यांप्रमाणे एकाच प्रकारच्या लोकांना मारत नव्हता. काही प्रकरणांचा छडा लावताना पोलिसांनी अंदाज बांधला होता की कुर्हाडीने मारणारा हा एक्समॅन नक्की कोण असेल ते...
पण पुरावे पुरेसे नसल्याने तो फक्त एक अंदाजच बनून राहिला. एक्समॅन इतर खुन्यांप्रमाणे नव्हता. त्याचे बळी हे कुणीही यादुच्छित लोकं असायचे ज्यांचा एकमेकांशी दुरान्वयेही संबंधसुद्धा नव्हता. लोकं त्याच्या मारामुळे मृत्युमुखीच पडायचे. तो शरिरावर जखमा करत असे त्यातुन रक्तस्त्राव होऊन लोक मरत होते. त्याचे बळी ईतके रँडम होते की त्यात एक गर्भवती स्त्री आणि एक अपंग मुलगा ही होता. आपल्या या कृत्याने तो शहराला जणु वेंगाडुन दाखवत होता. तेथील पोलिस यंत्रणेसाठी हे एक आव्हान झाले होते. त्यातच त्याने एका वर्तमानपत्रात जबाब दिला. त्यात त्याने स्वतःला यमराजाचा दुत असल्याचे सांगितले होते. तो कधीच पकडला जाऊ शकत नाही हा फोल आत्मविश्वास त्याला खुन करायला ताकद देत होता. या सगळ्या गदारोळात त्याने अजुन एक पत्र वर्तमानपत्राला दिले होते त्यात
"आज मध्यरात्रीनंतर पंधरा मिनिटातच मी एक खुन करणार आहे. परंतु शहरात आज ज्या ठिकाणी जॅझ संगीताचा कार्यक्रम असेल तिथे मी कुणालाही मारणार नाही."
यापत्रामुळे त्या रात्री सर्वत्र शहरात जॅझ संगीत लावण्यात आले होते. सगळ्यात आश्चर्यकारक घटना म्हणजे त्या रात्री कुठेही खुन झाला नाही. त्या आधी एक्समॅनने तब्बल बारा जणांना मारले होते.
एक्समॅन कोण होता या बद्दल बरेच वेगवेगळे अंदाज लोकांनी बांधले होते. एक असाही अंदाज की अंडरवर्ल्ड डॉन किंवा माफियाचा या खुनांमध्ये सामिल असावे. परंतु त्या अपंग मुलाच्या खुनानंतर हे अंदाज कोलमडुन पडले. एक अफवा अशीही होती की, जोसेफ मॉमफ्रे नावाच्या इसमाचा या सगळ्या खुनामागे हात आहे. या अफवेनंतर एका खुन झालेल्या माणसाच्या विधवेने जोसेफचा काटा काढला. आश्चर्यकारकरित्या या घटनेनंतर शहरातील खुनही थांबले. पोलिसांना मात्र जोसेफच खुनी आहे असे काहीच पुरावे हाती लागले नाहीत.