ढ हे अक्षर असे आहे कि त्याचा फारसा उपयोग झालेला आढळत नाही. संपूर्ण बाराखडीत ञ हे अक्षर जसे अगदीच अस्पृश्य वाटते, तसेच ढ हे अक्षर फार कमी शब्दात आढळून येते. रामायणात शत्रुघ्नाला जो scope असतो ढ ला सुद्धा तेव्हडाच role आपल्या भाषेत आहे. नाही म्हणायला एका फार महत्वाच्या शब्दात हे अक्षर आढळून येते. तो शब्द म्हणजे गाढव. इतर काही शब्दाचीच उदाहरणे द्यायची जाले तर “ढेकुण”, “धेपालाने”, “ढोसणे” इत्यादी. ह्यातील कुठल्याच शब्दाने मनाला प्रसन्नता येण्याचा संभव नाही.
आपल्या अक्षरांचा समूहाला वर्णमाला असे म्हणतात. त्यात बहुदा अ , क हि मंडळी ब्राह्मण वर्णाची असावी व ञ, ढ हि सुदर असावी. “अक्षराणाम अकारो अस्मि ” असे साक्षात भगवानाने म्हणून अ चा उच्च वर्ण सिद्ध केला आहे.
पण ढ च्या वाट्याला जी उपेक्षा येते तीच उपेक्षा विद्यार्थी गणातील काहींच्या वाट्याला येते. म्हणूच बहुदा अश्या विद्यार्थ्यांना ढ म्हणून संबोधिले जाते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे ढ पणाची लक्षणे नेहमीच पाळण्यात दिसत नाहीत. ती दिसायला शाळा नावाच्या एक dedicated वातावरणात जावे लागते. तिथे एरवी सगळी समान दिसणारी मुले अचानक दोन गटात विभागली जातात. एक ढ चा गट आणि दुसरा अ चा गट.
ढ मुले कुणाला आवडत नाहीत असा प्रकार नसतो. त्यांचा कुणालाच फारसा उपयोग नसतो. उपयोग नसलेल्या वस्तूला आम्ही अडगळीत टाकून देतो तसेच ह्या मुलांना अडगळीत टाकले असते. शाळेत मुलांची संख्या फार व शिक्षकांची संख्या जास्त झाली कि हि अडगळ नकोशी वाटते. त्यातच मास्तरा कडून काही चांगल्या वागणुकीची अपेक्षा नसल्यामुळे मास्तरांची खुशामत करण्यात सुद्धा ह्या मंडळीना विशेच आवड नसते. त्यातच शिक्षण हे ढ लोकांसाठी नसतेच जणू काही हे सत्य त्यांच्या मनात रुजत जाते. काही चतुर मंडळी त्यावर चित्रपट काढतात. असे दाखवतात कि मुळात हाड ढ हा ढ नव्हताच. ढ आम्ही होतो, तो तर चांगला चित्रकार असतो. तारे जामीन पार मध्ये ईशान अवस्थी ला आपण मनोमन मानतो. ढ हि मुले ढ नसतात अशी आपण समजूत करून घेतो.
पण आपल्या दूधवाल्याचा ढ वर्गात मोडणारा मुलगा सहावी इयत्तेतच सिगारेट फुंकायला लागलाय ह्या बातमिचा धक्का आपण कसा बस सावरतो. अमीर खान ने आम्हाला उल्लू बनवला म्हणून मनात शिव्या शाप मोजायला लागतो.
वास्तविक त्या ढ ला जीवनाचे गमक समजले असते. किंवा हि ढ मुले एवढया संख्येने असतात कि त्यांचे ज्ञान हेच समाजाचे ज्ञान बनत जाते. शेवटी रिक्षावाला, बस चालक आणि वाहक , दुधवाला, टपरी वरचा पोऱ्या, पिझ्झा आणून देणारा हे सगळे पूर्वाश्रमीचे ढ च असतात. नाही म्हणायला काही राजकारणात शिरून डरकाळ्या मारतात.
आपण सुद्धा स्वतःला ढ समजत आलेलो असतो. वर्गातील अ मुले मुली उच्च पदस्थ नोकर्या करत असतात आपण फारतर कारकुनी करत असतो. आपला मुलगा टी वी बघत बसलेलो असतो व आपण उगाचच मी त्या गणितातील प्रमेयाना आणि इंग्रजीच्या व्याकरणाला भ्यायचो असे मनाशी बोलत चहाचे घुटके घेत राहतो. पण नाही म्हणायला गणितात नेहमी एक आकडी मार्क घेवून फेल होणार्या व सातवी शाळा सोडून गेलेल्या बाळ्या फुर्सुन्गीचे की झाले हा विचार, किंवा गालावर छान खळी पडणाऱ्या स्मिताच कुणा बरोबर लग्न झाले असेल हा विचार मनात डोकावल्या शिवाय राहत नाही.