सहजच सुचलेलं ....!!
आयुष्यात जेव्हा जेव्हा निराशा घेरुन टाकेल माझ्याकडे काहीच नाही असं वाटायला लागेल तेव्हा एकच करायचं
कपाट आवरायला घ्यायचं आपल्या कडे असणाऱ्या गोष्टी बघून मनाला उजाळा द्यायचा अरे! हे ही आहे कि माझ्या कडे ...असं म्हणतं म्हणतं स्वतःच मिळवलेल्या असंख्य वस्तूंवरचे आठवणींचे पदर उलगड उलगडत .,.प्रत्येक वस्तूला स्पर्श करत त्यातले हळूवारपण जपत ओळखत ...हे मला कुणी दिले ..ह्याने हे दिले होते त्याने हे दिले होते ह्या कार्यक्रमला ...मग नकळत वस्तूंबरोबरची ओळख अनुभवत छान वेळ जाईल .,.अरे हे ही माझ्या कडे आहे कि ..इतके दिवस कुठे होते ...मी हे शोधत होते .,.अशी स्वगत स्वतःलाच उमेद देत आलेली मरगळ दूर करतील .,..पण अशा आठवणी नसतील तरी वस्तू तुमच्या कडे तुम्ही मिळवलेल्या असतातच प्रत्येकी ला आपल्या स्वःकमाईचा एक वेगळाच गंध असतो याने आपणच आपल्याला शाबासकी देत प्रोत्साहन देत ....उत्साही बनवतो...निर्जीव वस्तू त चैतन्य नसले तरी आपला असा पोत असतो मायेचा हळूवारपणाचा....मन भरुन येईल ते मिळवण्यासाठी केलेली धडपड आठवेल...अन् पुन्हा नव्याने म्हणत मनाला आलेली मरगळ क्षणार्धात पळून जाईल....निराशेने घेरलेली ती वेळ आशेचा कवडसा दाखवेल..मनाला सुखावेल...बघा करुन...या लाँकडाऊन मधे ...कपाटालाही झळाळी मिळेल..वेळेचा सदुपयोगही..कंटाळा पळून जाईल...
अर्थात व्यक्ती सापेक्षता ...व्यक्ती भिन्नता ...आदरच
©मधुरा धायगुडे