वाडियार राजघराण्याची मुळे श्रीकृष्णाच्या यादुवंशीय कुळातील आहेत. त्यांचे वंशज आजही मैसुरच्या सुंदर आणि संपन्न महालात राहतात. आज वाडियार राजघराण्याचा प्रमुख हा सगळ्यात तरुण महाराज आहे. वाडियार राजघराण्याचा प्रमुख सत्तावीस वर्षाचा यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार आहे.
महाराज यदुवीर हे वाडियारांचे थेट वारसदार नाहित. त्यांचे काका श्रीकांयदत्त वाडियर यांचा मृत्यु २०१३ साली झाला. ते निःसंतान वारले. त्यानंतर त्यांची पत्नी महाराणी राजमाता यांनी आत्ताचे महाराज यदुवीर यांना दत्तक घेतले. मैसुर शहर हे रेशमासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराज श्रीकांतदत्त यांनी 'रॉयल सिल्क ऑफ मैसुर' अश्या नावाने क्लोथिंग बिझनेस सुरु केला. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले.
त्ताचे महाराज यदुवीर ह्यांनी ईंग्रजी साहित्यामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवली आहे. त्यांनी दुंगारपुरची राजकन्या त्रिशीकाकुमारी सिंग ह्यांच्याशी २०१३ मध्ये लग्न केले. त्यांना आता एक मुलगा आहे. वाडियार राजघराण्याची मालमत्ता, जमिन जुमला ह्याची आजच्या काळातली किंमत साधारण दहा हजार करोड रुपये इतकी आहे