बडोदा म्हणजेच वडोदरा ह्या ठिकाणी राहणारे गायकवाड राजघराणे मुळचे पुण्याचे आहेत. १८व्या शतकापासुन हे राजघराणे बडोद्यावर राज्य करत अाहे. सध्या बावन्न वर्षीय समरजीतसिंग गायकवाड हे गायकवाड राजघराण्याचे प्रमुख आहेत. महाराज समरजीतसिंग जेव्हा सिंहासनावर बसले त्यावेळी त्यांच्या संपत्तीची किंमत वीस हजार करोड इतकी होती. भारतातील सगळ्या राजघराण्यापैकी बडोद्याचे गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस हा जगातील सगळ्यात मोठे खाजगी निवासस्थान आहे.
इतकेच नव्हे तर, गायकवाड राजघराण्याच्या संग्रही राजा रवी वर्मा यांची काही पेंटिंगस् आहेत. या शिवाय अनेक सोन्या चांदीची मालमत्ता आहे. गायकवाड राजघराणे बनारस आणि गुजराथ मधील सतरा मंदिरांच्या विश्वस्थपदी आहेत. गायकवाडांच्या पॅलेसमध्ये दहा होलसचे गोल्फचे मैदान बांधले आहे. समरजीतसिंग हे एक उत्तम क्रिकेटपटु होते. ते आपल्या राज्यातुन रणजी खेळले होते. त्यांनी राजकारणातही जाण्याचा वरकर्मी प्रयत्न केला होता पण तो विफल झाला. ते २०१७ पासुन राजकारणातुन बाहेर पडले आहेत.