रॉयल राजस्थान ऑन व्हीलस- (44६६ किमी- ०७ रात्री/०८ दिवस)
रॉयल राजस्थान ऑन व्हील्स हि ट्रेन राजस्थानच्या पर्यटन मंडळाने चालू केली आहे. हि गाडी दुसऱ्या गाडीपेक्षा मोठी आहे. यामध्ये जास्त कोचेस आहेत. याचे नाव राजस्थान मध्ये वसलेल्या राजघराण्यांचा विचार करून ठेवण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये वाय-फाय, टी.व्ही. भरपूर सुख-सुविधा आहेत. यामध्ये जे केबिन आहेत त्यांना राजस्थान मधील वास्तूंची नवे दिली आहेत. हवा महल, पद्मिनी महल, किशोरी महल, फुल महल, सुपर डिलक्स केबिनचे नव ताज महल आहे. डायमंड आणि एमराल्ड अशीही नवे आहेत. प्रत्येक केबिनच्या बाथरूममध्ये शॉवर क्युबिकल आहे. तिथेच काचेचे बेसिन्ही लावण्यात आले आहे. हे सगळे वातावरण पर्यटकांना महालात राहिल्याचे अनुभव करून देते.
याचे प्रती व्यक्ती भाडे किती??
ऑक्यूपंसी प्रकार |
विदेशी पर्यटकांसाठी(यु.एस.डी.) |
भारतीयांसाठी(रुपया मध्ये) |
सिंगल |
950 प्रती व्यक्ती /रात्र |
64600 प्रती व्यक्ती /रात्र |
डबल |
715 प्रती व्यक्ती /रात्र |
48620 प्रती व्यक्ती /रात्र |
सुपर डिलक्स सूट |
1980प्रती व्यक्ती /रात्र |
134640 प्रती व्यक्ती /रात्र |