हे वाक्य म्हणजे माझ्यासाठी एक मानसिकता आहे. ज्यात समोरची व्यक्ती, म्हणजे ती आपल्या ओळखीची कोणीही असू शकते, ती व्यक्ती अंधश्रद्धा, चमत्कार, जादू अशा गोष्टी बाजूला ठेवून हे मान्य करते की ज्या गोष्टी घडतात, त्यामागे विज्ञान आहे, पण ते विज्ञान त्यांना माहित नसतं. त्यामागचं त्यांना माहित नसलेलं कारण हे त्यांच्यासाठी सायन्स असतं. मग निरीक्षण करू लागलो, बरेच जण असे शब्द वापरताना दिसू लागले. जिथे शक्य असायचे, तिथे त्यांना ते (त्यांच्या शब्दांत) सायन्स सांगता येत होते, पण प्रत्येक वेळी असे घडायचेच असे नाही, काही प्रश्न असे असायचे की, तेव्हा असे विषय घेऊन पुस्तकांची मालिका सुरु करण्याचा विचार मनात आला, ज्याचे नाव असेल, विज्ञानामागील सायन्स.