महासागर म्हणा किंवा समुद्र, तो अथांग ,असीम ,गहिरा, व्यापक अशा निरनिराळ्या उपमांनी ओळखला जातो. अनेकांना या अथांग, खोल डोहामध्ये जीवनाचे सत्य जाणवते. आयुष्याचे निरनिराळे रंग एकत्र घेऊन मनुष्याला विविध पैलू दर्शवणाऱ्या समुद्रामध्ये कवी कल्पनांच्या पलीकडे सुद्धा अनेक रहस्य दडलेली आहेत. यांपैकी काही रहस्य ही समोर आली आहेत, मात्र ही रहस्य नक्की काय आहेत हे उकलणे आज सुद्धा शक्य झालेले नाही. जगभराला लाभलेल्या समुद्र क्षेत्रांमध्ये ही निरनिराळी रहस्य विखुरलेली आहेत. पृथ्वीतलावर एकूण क्षेत्रापैकी दोन तृतीयांश क्षेत्र समुद्राने (उत्तरामध्ये यापुढे महासागर हा शब्द सायलेंट असेल) व्यापलेले आहे. समुद्राच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ पाच टक्के क्षेत्राबद्दल संशोधकांना परिपूर्ण माहिती मिळाली आहे, आणि उर्वरित 95 टक्के माहितीकडे अद्यापही एक रहस्य म्हणूनच पाहिले जाते .समुद्राचे किनारे आणि समुद्र तळामध्ये अनेक अशी रहस्य दडलेली आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला वर्तमानामध्येसुद्धा चक्रावून सोडले आहे. त्यांपैकी निवडक रहस्ये किंवा घटना उत्तरामध्ये सादर करीत आहे. पण लक्षात घ्या, वर सांगितल्याप्रमाणे 95% रहस्यांपैकी 94% रहस्य वगळून जरी निवडक गोष्टी सांगत असलो, तरी उत्तराची लांबी वाढण्याची शक्यता आहे.