समुद्रात असे अनेक सजीव आहेत, जे दिवसा बाहेर न येता फक्त रात्रीच बाहेर येतात. रात्री जेव्हा समुद्राच्या लाटा रोरावत किनाऱ्यावर धडकतात, तेव्हा त्यांसोबत निळ्या रंगाचे असंख्य दिवे किनाऱ्यावर येतात. समुद्रात डाईनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकत असतात. हे जीव कॅरेबियन देशांतील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दिसतात. रात्रीच्या वेळी यांची चमक दिसते. विशेष करून रात्री समुद्रातून जहाज किंवा मोठा प्राणी जातो तेव्हा यांची चमक दिसते. जेव्हा डाईनोफ्लॅगेटसची संख्या वाढते तेव्हा ते लालसर रंगाचे होतात. त्यावेळी त्यांना लाल ज्वर ही म्हणतात. यातील काही विषारीही असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.