जीवनात गुंतलेला
ऋणानुबंध असावा,
शिंपल्यात जपलेला
एक मित्र असावा...
गेलो सोडून जरी
रडणारा गाव असावा,
नको निषापाप फुलं
सोबतीला कोण कशाला हवा...
जळता जळता सरणावरती
अत्तराचा एक थेंब असावा,
क्षणोक्षणी आठवण यावी
घडलेला सहवास असावा..
उंच उडणाऱ्या ज्वालांवर्ती
अभिषेक अश्रूंचा व्हावा,
विझता विझता सोडून
कधी मीच माझा व्हावा...
दाट धुरांमधून सरतांना
उंच आभाळातून पाहतांना,
सांडलेला ऋणानुबंध
स्मशानातही भरता यावा..
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.