हतबल होऊन माणूस
सरणावरती चढत आहे,
बेफान होऊन काळ
रोज जाळीत आहे...
चालती बोलती माणसं
पडद्याआड होऊ लागली
गंगे वाचून अभिषेक
अश्रुंचे करू लागली...
जळता जळता माघे कुणी
अश्रूलाही उरत नाही,
शोकांतिका मरणाची
मनातूनही सरत नाही...
सांग देवा माणसानं
कसं आता वागायचं,
दुखवटा घेऊन सारखं
कुठं कुठं फिरायचं....
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.