आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ:- 6 pm. ( सायंकाळची वेळ.)
( रमा आणि अशोक ५० वर्षांच्या आसपास दोघांच वय, अशोक काॅटवर बसला आहे आणि रमा त्याच्या बाजूला, रमाच्या डोळ्यात अश्रू आहेत.)
रमा:- पोटचा गोळा, असं कुणी करत का?
अशोक:- आपण पळून जाऊन, आपल्या आईवडिलांना दुखावलं त्याची शिक्षा असेल ही...
( रूममधल्या समोरच्या भिंडीकडे पाहत.)
रमा:- प्रारब्धाच्या गोष्टी असतात नाही का शेवटी?
अशोक:- खरयं रमा तुझं.
( रमाकडे पाहत.)
रमा:- आता काय करायचं हो?
अशोक:- आता काय?
( स्वत:शी तो शब्द उच्चारत, दोन्ही हाताची मूठ घट्ट आवळून.)
रमा:- तुम्हाला आठवतयं, तुम्ही तरूण वयात किती गोड दिसायचातं.
( डोळ्यातल्या अश्रूंसोबत चेहऱ्यावर हसू आणत अशोककडे पाहत.)
अशोक:- आठवतयं ना, आणि आपलं एक स्वप्नही होतं तुला आठवतयं का?
( जरासं स्मित हास्य करून रमाकडे पाहत.)
रमा:- हो.
( रमा स्वत:च्या डोळ्यातील अश्रू पुसते.)
प्रसंग समाप्त