फ्लॅशबॅक:-

आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ:- 10 am. ( सकाळची वेळ.)

( रमा आणि अशोक वयाच्या 25 व्या वर्षी लग्न करून गावाकडून पळून पुण्यात आहे आहेत. एका रूममधे दोघे आता राहणार आहेत, दोघांचा इथे संवाद.)

रमा:- होईल का सगळं ठीक?
( जरा काळजीच्या स्वरात.)

अशोक:- हो गं, नको जास्त ताण घेऊ, आणि आधीच आपलं ठरलं होतं ना.

रमा:- पण तरी अनोळख्या शहरात घर सोडून.

अशोक:- लग्न केलयं आपण आता, बाकीची चिंता नाही आता आपल्या संसाराची चिंता करायची.

रमा:- तेही खरचं आहे.

अशोक:- सगळं छान करूयात आपण, आपण या शहरात 1 बीएचके फ्लॅट खरेदी करूयात.

रमा:- आपल्याच्याने होईल का तेवढं?

अशोक:- होईल ना, हमखास होईल.
( तेवढ्यात अशोकच्या फोनची रिंग वाजते, तो फोन घेऊन उठून बाहेर जातो.)

( रमा काॅटवरून उठून रूममधील देवघारच्या देवाला पाहून नमस्कार करते.)

रमा:- देवा, प्रारब्धाच्या गोष्टी आहेत बघं, आम्ही नेहमी चांगलचं राहतो आमचही चांगलच कर बाबा.
( डोळे बंद करून देवाला हात जोडते.)

            प्रसंग समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel