फ्लॅशबॅक
Ext. रूमबाहेरील चाळीतील मोकळी जागा. प्रसंगाची वेळ:- 12 pm. ( दुपारची वेळ.)
( चाळीतल्या एका घराच्या ऐन दारात सखूताई बसली आहे, तिच्यासमोरच्या दारात निशा उभी आहे.)
सखू:- काय गं, ते नवीन रहायला आलेलं जोडपं पाहिलसं?
निशा:- हो ना, मस्तयं एकदम क्युट, जोडा छान आहे.
सखू:- कशाचा छान, नुसता उदोउदोचं वाटतो मला तर कधीकधी.
निशा:- का? तुमचा नवरा एवढा रोमॅन्टिक नाही म्हणून असं वाटतं ना, खरं सांगा... ( हसत हसत फिरकी घेते.)
सखू:- निशे लई मोठ्ठी झालीस कार्टे, थांब तुझ्या आईलाच सांगते.
निशा:- वेगळं काय सांगणार आहात आता, मागच्या वेळीसारखंच ना पोरगी वयात आली लग्न करा हे ते, आजकाल काॅमन ये वो सगळं...
सखू:- बाई, पोरीला ना लाजचं नाही.
( तेवढ्यात रमा आणि अशोक बाहेरून येत असतात.)
निशा:- ( रमाला पाहून) काकू छान दिसतायं आज.
रमा:- थॅंक्यू निशा! नवीन साडी भेटली बघं टोकण वर, दाखवते हं...
( रमाच्या हातातील पिशवीतून ती एक साठी काडुन दाखवते.)
( निशा जवळ येऊन साठी पाहू लागते.)
अशोक:- तुमचं चालू द्या. ( अशोक घरात जातो.)
सखू:- भन्नाट काकू, टोकण काका. छान जुळतयं की रिदम. ( स्वत:च हसते.)
रमा:- छानचयं. ( रमाच्या चेहऱ्यावर हास्य आहे.)
प्रसंग समाप्त