फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 9 am. ( सकाळ)
( रमाने डब्बा भरून ठेवला आहे, अशोक कपडे घालून कामावर जायला तयार झाला आहे.)
अशोक चल रमा, येऊ मग मी.
रमा हो या, पण त्या आधी एक बातमी द्यायची होती.
अशोक हां सांग ना.
रमा थोडीशी सरप्राईजींग आहे बरं का पण?
अशोक सरप्राईजींग, खरचं?
रमा हो. गेस करता का?
अशोक कशाबद्दल आहे?
रमा आपल्या चाळीत एका नव्या रडगाणं करणाऱ्याची भर पडणार आहे.
अशोक ( तिला म्हणायचं आहे बाळाची पण ते अशोकला वेगळचं वाटतं.) काय सांगतेस? १००% त्या सखुसारखी कोणीतरी बाई चाळीत रहायला येणार असेल मग.
रमा वा गं माझं हुशार गबाळं, तसं नाही.
अशोक मग?
रमा जास्त रडत कोण?
अशोक नाही माहित मला असं कोण, ज्याला दुख: झालयं असं कोणीही रडू शकत जास्त.
रमा अवघडं आहे, अहो मी प्रेग्नंट राहिली आहे.
अशोक व्वा, रापचिक बातमी दिलीस रमा तू तर, काय भारी रावं, मी बाप होणार.
रमा हो, आधी घड्याळाकडे लक्ष द्या, टाईम होत आलायं तुमचा.
अशोक अरे, हो हो. बरं ऐक मी ना संध्याकाळी येताना गोडधोड घेऊनच येतो आज, तुला बरं नसेल तर सखुला सांगून जाऊ का तुझ्याकडे थोड लक्ष ठेवायला.
रमा अहो, आत्ता काही गरज नाही त्याची, या तुम्ही, बोलू आपण निवांत संध्याकाळी.
अशोक हो नक्की, काळजी घे हां, चल निघतो मी, बाय. आणि थॅंक्स, एवढी भन्नाट बातमी दिलीस.
रमा हो हो, या तुम्ही आता, बाय.
अशोक हो.
( अशोक घरातून निघून जातो.)
प्रसंग समाप्त