फ्लॅशबॅक
Ext. रूबाहेरील चाळीतील मोकळी जागा. प्रसंगाची वेळ 6pm ( सायंकाळ)
( निशा ऊभी आहे, सखू आणि रमा एकमेकींच्या आजूबाजूला बसल्या आहेत. सखू सुपात काहीतरी धान्य निवडत आहे, निशा व रमा चहा पित आहेत.)
निशा काकू, काय भारी रावं तुम्ही.
सखू रमा बारसं ठेवावं लागलं बरं का तुला.
रमा ठेवू की, मोजक्याच बाया इथल्या बोलवू आणि करू साध्या पद्धतीनं.
निशा हो ना, भारीच की, काकू तुमच्या मुलाला पहिली आंघोळ मी घालणार बघा.
सखू अयं, एक्स्पिरियन्स लोकं पहिले. तुझं काय मधीच? नव्या बाळाला नीट हातात तरी घेता येत का तुला?
रमा अगं भांडू नका.
निशा येत ना काकू, काय तुम्हीपण, इज्जत काढता का काय?
सखू बाई पोरगी निव्वळ रट्टाळ बोलती, तुझ्या आईला हजारदा सांगुन पण उपयोग नाही.
निशा असचं असतयं, जगणाऱ्याला असण्याची किंमत असली पाहिजे, सोडा माझी फिलोसाॅफी तुम्हाला नाही कळणारं.
रमा बरं, तुझ्या हिशोबाच्या गोष्टी तू करत जा बाई, तुला नाही कोण आडवत.
निशा आस्स जरा काकू. ( हसते.)
रमा बरं चालू द्या चर्चा तुमची, मी आलेच घरातून जरा.
( रमा घरात जाते, सखू आणि निशा तिथेच आहेत.)
प्रसंग समाप्त